मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By
Last Updated : सोमवार, 20 मे 2019 (12:40 IST)

World Cup पूर्वी कोहलीने उघडलं गुपित, यामुळे खास आहे महेन्द्र सिंग धोनी

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा अनुभव कर्णधार विराट कोहलीसाठी अनेकदा उपयुक्त ठरला आहे. कोहलीने एका मुलाखतीत एक क्रिकेटपटू म्हणून धोनीच्या सर्वात मोठ्या विशेषतेबद्दल गुपित  उघडलं आहे.
 
या मुलाखतीत कोहलीने सांगितले की कसा धोनीच्या नेतृत्वाखाली त्याने आपलं करिअर सुरू केलं आणि आता संघाचं नेतृत्व करत आहे. त्याने असेही सांगितले की गेल्या काही वर्षांत तो  धोनीच्या जवळ आला. कोहली म्हणाला, माझा करिअर धोनीच्या नेतृत्वाखाली सुरु झाला आणि बर्याच लोकांनी गेल्या काही वर्षांत माझ्यासारखे इतरांनी त्यांना जवळून बघितले आहे. तो म्हणाला की धोनीसाठी टीम नेहमी सर्वोपरी आहे. काहीही झालं तरी तो नेहमी संघाबद्दल विचार करतो. त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे. अलीकडे आयपीएलमध्ये ही स्टंपिंगने त्याने बर्‍याच सामन्यांचे  निर्णय बदलले आहे. 
 
कोहलीने एका प्रश्नाचे उत्तर देत म्हटले की धोनीची टीका होणे खरोखरच दुर्दैवी आहे. तो म्हणाला की मला वाटतं की लोकांमध्ये धैर्य कमी आहे. एक दिवस बिघडलं तर लोक काहीही बोलू लागतात. पण खरं तर हे आहे की एमएस धोनी खेळामधील सर्वात हुशार खेळाडूंपैकी एक आहे. त्याची विकेट कीपिंग मौल्यवान आहे. हे सर्व काही मला माझ्या मनासारखे करण्याचे स्वातंत्र्य प्रदान करतं.