विराट कोहलीला केरळ उच्च न्यायालयाची नोटीस
भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विराट कोहलीस ऑनलाईन रमी गेमींगचे प्रमोशन केल्याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.
लॉकडाउनच्या काळात ऑनलाईन गेम्सची लोकप्रियता वाढली असली तरी ऑनलाईन गेमवर बंदी घालण्यासाठी याचिका केरळ उच्च न्यायालयात दाखल आहे. ऑनलाईन गेममुळे अनेकांचे नुकसान देखील झाले आहे. या अॅप्सचे प्रमोशन केल्यामुळे तरुणांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे याचिकेत नमुद करण्यात आले आहे.
विराट कोहलीसह अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता अजू वर्गीस या दोघांना देखील नोटीस पाठवण्यात आली आहे.