1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (09:13 IST)

आम्ही सर्व तुझ्यासोबत, मोहम्मद शमीच्या ट्रोलर्सना राहुल गांधींचं उत्तर

We are all with you
भारत-पाकिस्तान सामन्यातल्या पराभवानंतर सोशल मीडियावर मोहम्मद शमीला ट्रोल करण्यात येतंय. राहुल गांधींनी ट्वीट करत शमीला पाठिंबा दिलाय.

राहुल गांधी ट्वीटमध्ये म्हणतात, "मोहम्मद शमी आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. या लोकांना कोणी प्रेम दिलंच नसल्याने या लोकांची मनं द्वेषाने भरलेली आहेत. त्यांना माफ कर."

क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेंनीही शमीवर टीका करणाऱ्यांना सुनावलं आहे.

ट्वीट करत हर्षा भोगलेंनी म्हटलंय, "मोहम्मद शमीबद्दल घाणेरड्या गोष्टी करणाऱ्यांना माझी एक विनंती आहे. तुम्ही क्रिकेट पाहणं सोडून द्या. तुमची कमी भासणार नाही."