शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (08:42 IST)

जळता फटाका अंगावर पडल्याने ७ वर्षाचा चिमुकला भाजला.. पालकांनो मुलांकडे लक्ष द्या

जळता फटाका अंगावर पडल्याने नाशिकच्या इंदिरानगर भागात एक ७ वर्षीय मुलगा गंभीर भाजला आहे.नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील पांडवनगरीत येथे राहणाऱ्या शौर्य लाखोडे या 7 वर्षाच्या मुलाला फटाके फोडणे अंगाशी आलंय. त्याच्यावर सध्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहे.

शौर्य हा त्याच्या मित्रासोबत फटाके फोडत होता. अशातच मित्राने फेकलेला जळता फटाका हा बाजूला उभा असलेल्या शौर्यच्या अंगावर जाऊन पडल्याने त्याच्या कपड्यांनी पेट घेतला. या घटनेत तो मोठ्या प्रमाणावर भाजला गेला. ही बाब लक्षात येताच शौर्यच्या घरच्यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यावर अधिक उपचार सुरू आहेत. त्यामुळे लहान मुलं फटाके फोडत असतांना पालकांनी स्वत: लक्ष देणं गरजेचं आहे.