1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

शाहू महाराजांनी समाजासाठी केलेले उल्लेखनीय कार्य

chhatrapati shahu maharaj
1. छत्रपती शाहू महाराजांच्या कामांमुळे त्यांचे विरोधी भयभीत झाले होते आणि त्यांना जीवावर बेतेल अशी धमकी देत असे. परंतू त्यांनी म्हटले की मी गादी सोडू शकतो परंतू सामाजिक प्रतिबद्धता कार्यांहून हात मागे काढणार नाही.
2. शाहू महाराजांनी आपल्या आदेशात म्हटले होते की त्यांच्या राज्यातील कोणत्याही कार्यालय आणि ग्राम पंचायतमध्ये दलित आणि मागासवर्गीयांसह समानतेचे व्यवहार झाला पाहिजे. अस्पृश्यता सहन केली जाणार नाही. दलित लोकांशी मानवीय व्यवहार केला गेला पाहिजे. मनुष्याला मनुष्य समजणार नाही तोपर्यंत समाजाचा विकास संभव नाही. 
3. त्यांचे म्हणणे होते की समजाच्या उन्नतीसाठी भेदभाव सर्वात मोठी बाधा आहे. जाती आधारित संघटनांचे निहित स्वार्थ असतात आणि अश्या संघटनां वाव देण्यापेक्षा त्यांना संपवणे गरजेचे आहे.
4. जाती व्यवस्था ब्राह्मणांची सर्वात मोठी ताकद आणि बहुजनांची सर्वात मोठी कमजोरी बनलेली आहे. भेद मिटविण्यासाठी शाहू महाराजांनी एका अस्पृश्य गंगाधर काम्बले कडून चहाची दुकान उघडवली आणि लोकांना संदेश देण्यासाठी ते स्वत: त्या चहाच्या दुकानात जाऊन चहा प्यायचे की जेव्हा महाराज अस्पृश्य आणि जाती मानत नाही तर जनतेनेही मानायला नको. त्या काळात एका अस्पृश्याची चहाची दुकान उघडवणे ब्राह्मणवादी जाती व्यवस्थेविरुद्ध सर्वात मोठे साहसी पाऊल होते.
5. बाबा साहेब डा. भीमराव आंबेडकर जेव्हा शिष्यवृत्तीवर शिकण्यासाठी परदेशात गेले होते तेव्हा त्यांना शिष्यवृत्ती संपल्यामुळे भारतात यावे लागले. जेव्हा महाराजांना हे माहीत पडले तर ते स्वत: भीमराव यांचा पत्ता शोधत मुंबईच्या चाळीत त्यांना भेटायला गेले आणि पुढील अभ्यास सुरू ठेवण्यासाठी मदत दिली होती. 
6. शोषित मागासवर्गीय लोकांना डा.. आंबेडकर यांच्या रूपात नेता मिळाल्याची घोषणा स्वत: शाहू महाराजांनी सभेत केली होती.
7- महाराजांनी पुनर्विवाह कायद्याला मान्यता दिली. त्यांना समाजातील कोणत्याही वर्गासाठी कोणत्याही प्रकाराचे द्वेष नव्हते.