शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

सावित्रीबाई फुले यांच्याशी निगडित 7 गोष्टी

सावित्रीबाई यांचा जन्म महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात नायगाव नावाच्या लहानश्या ग्रामीण भागात झाला होता. यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते.
 
विवाहच्या वेळी ज्योतिराव फुले यांचे वय 13 आणि सावित्रीबाई यांचे वय 9 असे होते. त्यांचा विवाह 1840 साली झाला होता.
 
सावित्रीबाई 1852 मध्ये उघडण्यास आलेल्या दलित मुलींच्या पहिल्या शाळेत शिक्षिका होत्या. यापूर्वी ज्योतिराव  यांनी 1848 साली मुलींसाठी शाळा काढली होती जिथे सावित्रीबाई शिकवत होत्या. त्या आपलं जीवन 
एका मिशनप्रमाणे जगल्या. जीवनाचा उद्देश्य विधवा विवाह, अस्पृश्य दूर करणे, महिलांना मुक्ती आणि दलित महिलांना शिक्षित करणे होतं.
 
सावित्रीबाई जेव्हा शिक्षण देण्यासाठी घरातून बाहेर पडायच्या तेव्हा लोकं त्यांच्यावर दगड आणि शेण फेकत होते. त्यांना शिव्या घालत होते कारण 160 वर्षांपूर्वी मुलींसाठी शाळा काढणे आणि त्यांना शिक्षण देणे पाप समजले जात होते. तरी सावित्रीबाई स्वत:च्या पिशवीत दुसरी साडी घेऊन जायच्या आणि शाळेत पोहचल्यावर साडी बदलून शिकवायच्या.
 
दलितांप्रती आपल्या भाषणात सावित्रीबाई म्हणायच्या की अस्पृश्यता का? त्यांना अशिक्षित का ठेवावे? आम्ही सगळे मनुष्य एकाच ईश्वराची संतान आहोत जोपर्यंत आम्ही हे समजून घेणार नाही तो पर्यंत ईश्वराचे मूळ रूप समजणे अवघड आहे.
 
ज्योतिराव यांना मठा नदीकाठी एक गर्भवती विधवा ब्राह्मणी भेटली. तेव्हा ते तिला म्हणाले की मुली तू आत्महत्या करू नकोस. मी तुझा धर्मपिता आहे. मला संतान नाही. मी तुला आपली धर्मकन्या समजून तुझी आणि तुझ्या गर्भात वाढत असलेल्या बाळाचा सांभाळ करेन. माझी बायकोदेखील तुला बघून प्रसन्न होईल.
 
प्लेग महामारीत सावित्रीबाई प्लेग आजार्‍यांची सेवा करत होत्या. एका प्लेग प्रभावित मुलाची सेवा करताना त्यादेखील आजारी पडल्या आणि यामुळे 10 मार्च, 1897 साली त्यांचे निधन झाले.