शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (09:41 IST)

अटलबिहारी वाजपेयी जयंती विशेष : अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनातील अंक 4 ची खास भूमिका

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनात अंक 4 ची भूमिका का खास ठरली, जाणून घ्या रोचक माहिती-
 
1. पहिली घटना आहे जेव्हा निवडणूक निकालानंतर राष्ट्राध्यक्ष यांनी फॅक्स संदेश पाठवून अटलजी यांना 10-3-1998 (10+3+1+9+9+8=40=4) ला बोलावले. अटलजींनी याच दिवशी राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. त्यांनी समर्थन देणार्‍यांची सूची मागितली.
 
2. 4 दिवसानंतर 14 मार्च रोजी एआयडीएमकेने राष्ट्रपतींना समर्थन पत्र पाठवले.
 
3. अटलजी यांनी 19-3-1998 (=40=4) रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
4. भाजप व सहयोगी पक्षांचा नॅशनल अजेंडा 13 (1+3=4) पक्षांद्वारे प्रस्तुत व स्वीकृत करण्यात आलं.
 
5. विश्वास मतावर मतदान देखील अंक 4 भाग्यांक असलेल्या दिवशी 28-3-1998 (=40=4) रोजी झाले.
 
6. विश्वास मताच्या पक्षात 274 (=13=4) मत पडले म्हणजे 4.
 
7. अटलजी यांनी विश्वास मत 274-261=13 (अर्थात 4) मतांची जिंकले.
 
8. आश्चर्य म्हणजे त्या दिवशी मतदान करणार्‍यांची संख्या 535 देखील 4 भाग्यांक होती. (5+3+5=13=4)।
 
9. 4 पक्ष (जनता पक्ष, भाजप, अकाली दल आणि नॅशनल कॉन्फ़रन्स) च्या काही सदस्य मतदानामध्ये सामील नव्हते.
 
10. अनपेक्षितरित्या टीडीपी चे 11 व 2 नामनिर्देशित एकूण 13 (=4) सदस्यांनी अटलजी यांच्या पक्षात मत दिले.
 
11. वर्ष 1991 मध्ये नरसिंहराव यांना विश्वास मत प्राप्त झाल्यापासून तो पर्यंत झालेल्या 6 विश्वास मत मधून पंतप्रधान वाजपेयी यांची विजय चौथ्यांदा विजय आहे.
 
12. वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात 4 महिला मंत्री होत्या (सुषमा स्वराज, मेनका गांधी, वसुंधरा राजे आणि उमा भारती. )
 
13. हे जाणून घेणे रोचक ठरेल की अटलजी यांची सरकार 13 दिवसात (=4) दिनांक 28-5-1996 (=40=4) ला भाग्यांक 4 असलेल्या दिवशी पडली होती.
 
14. वर्ष 1996 मध्ये जेव्हा वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा ते देशाचे 13वे पंतप्रधान होते.
 
15. पंतप्रधान बनणारे अटलजी देशाचे 13वे व्यक्ती (3+1=4) आहे. (नेहरू, नंदा, शास्त्री, इंदिरा गांधी, चरणसिंग, मोरारजी देसाई, राजीव गांधी,   व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर, नरसिंहराव, देवेगौडा, गुजराल आणि अटलजी).
 
16. अटलजी यांनी आपले संसदीय जीवन 4 भाग्यांक असलेल्या वर्ष 1957 (1+9+5+7=22=4) हून प्रारंभ केले होते.
 
17. वाजपेयी आपल्या आई-वडिलांची चौथी संतान होती- 1. अवधबिहारी, 2. सदाबिहारी, 3 प्रेमबिहारी, 4. अटलबिहारी.
 
18. वाजपेयी यांचा जन्म डिसेंबरच्या चौथ्या आठवड्यात रात्री चौथ्या प्रहरी झाला होता.
 
19 संसदेसाठी 4576 (4+5+7+6+=22=4) उमेदवार मैदानात होते.
 
20. ते निवडणूक मैदानात होते तेव्हा देशाचे 4 माजी प्रंतप्रधान निवडणूक लढले व जिंकले. (चंद्रशेखर, देवेगौडा, गुजराल आणि अटलजी).
 
21. मध्यप्रदेशहून 40 आणि उत्तरप्रदेशाहून 85 (8+5=13=1+3=4) खासदार निवडून येतात. काय हे उल्लेखनीय नाही की वाजपेयी यांच्या पक्षाला सर्वाधिक यश येथे मिळाले.
 
22. वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळाचे शपथ लग्न 2 आणि नवांश लग्न 11 आहे ज्यांचे योग देखील 13=4. अस्तु या सरकारासाठी अंक 4 अर्थात 4था दिवस, 4था महिना आणि 4था वर्ष अती महत्त्वपूर्ण आहे. सरकारचा 13वा, 22वा, 31वा, 40वा,  49वा आणि 58वा महिनादेखील विशेष घटनांसाठी लक्षात ठेवला जाईल.
 
23. 2014 मध्ये यांना भारत रत्न देण्याची घोषणा झाली असून 27 मार्च, 2015 मध्ये यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.