संशोधनातून बनवली बॅटरीवर चालणारी बाईक
प्रयागराजमधील बारावीचा विद्यार्थी शिवम चौहान (18) याने 13 रुपयात 100 किलोमीटर चालणारी बाईक बनवली आहे. या बाईकसाठी कोणत्याही इंधनाची गरज नसून ती बॅटरीवर चालणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नीतीन गडकरी यांनी या अनोख्य़ा संशोधनाबाबत शिवमचे कौतुक केले आहे.
इतर बाईकपेक्षा यात कोणतीही वेगळे स्पेअर पार्ट वापरलेले नाहीत असेही त्याने सांगितले. या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे ही अवघ्या 13 रुपयात 100 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. तसेच एकदाच ही बाईक पूर्ण चार्ज केल्यावर 50 हजार किलोमीटरचा प्रवास करू शकणार आहे. या बाईकचा वेग 60 किलोमीटर प्रतितास असेल. तसेच बाईकच्या गतीचा परिणाम एव्हरेजवर होणार नाही. ही बाईक बनवण्यासाठी शिवमला तीन महिने लागले असून त्यासाठी पाच लाखांचा खर्च करण्यात आला आहे.