1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 23 जुलै 2022 (11:36 IST)

Chandrashekhar Azad Jayanti:चंद्रशेखर आझाद जयंती विशेष

Chandrashekhar Azad Jayanti: आज (23 जुलै) मध्य प्रदेशातील लाल चंद्रशेखर आझाद यांची जयंती आहे. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी अलिराजपूर संस्थानातील एका ब्राह्मण कुटुंबात भाभ्रा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी आणि आईचे नाव जागराणी देवी होते.

चंद्रशेखर आझाद हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक होते . चंद्रशेखर आझाद यांच्या पराक्रमाची गाथा भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. त्यांची शौर्यगाथा देशवासीयांसाठी प्रेरणादायी आहे.1921 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी ते असहकार चळवळीत सामील झाले. चंद्रशेखर आझाद, काकोरी ट्रेन दरोडा आणि सॉंडर्सच्या हत्येमध्ये सामील असलेले निर्भीड क्रांतिकारक होते. चंद्रशेखर आझाद यांचे सुरुवातीचे आयुष्य आदिवासीबहुल भागात भवरा गावात गेले. भिल्ल मुलांसोबत राहताना चंद्रशेखर आझाद लहानपणी धनुष्यबाण चालवायला शिकले.असहकार आंदोलनात देशभक्त असल्यामुळे चळवळीत भाग घेण्यास सोपं झालं.

या आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना कैद करण्यात आलं. त्यांना न्यायालयात न्यायधीशांने नाव विचारल्यावर त्यांनी आपले नाव आझाद म्हणून सांगितले. तेव्हा पासून ते चंद्रशेखर तिवारी नाही तर चंद्रशेखर आझाद या नावाने ओळखू जाऊ लागले. न्यायाधीशांच्या समोर उलट उत्तर दिल्यामुळे त्यांना चाबकाचे फटके देण्यात आले. त्यावेळी देखील ते भारत माता की जय अशा घोषणा देत होते. त्या वेळी ते अवघे 15 वर्षाचे होते. 
 
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचं मोठं योगदान होत. स्वातंत्र्याच्या लढला त्यांनी आपले प्राण देशासाठी बलिदान दिले. आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचे त्यांचे स्वपन होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले आणि आपल्या प्राणाचे बलिदान दिले.  त्यांनी इंग्रजांची खजिन्याने भरलेली काकोरी मध्ये ट्रेन लुटली. या लूट मध्ये राम प्रसाद बिस्मिल, अश्फाक उल्ला खान, राजेंद्रनाथ लाहिडी, ठाकूर रोशन सिंह, यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 
 
चंद्रशेखर आझाद यांच्यापुढे पुन्हा नव्याने संस्थेला उभारी देण्याचे आव्हान उभे राहिले. ओजस्वी, विद्रोही, आणि तापट स्वभावाचे चंद्रशेखर आझाद इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन दिल्लीला निघून गेले. त्याठिकाणी त्यांनी क्रांतीकारकांची एक सभा आयोजित केली. येथे त्यांची भेट भगतसिंग यांच्याशी झाली. चंद्रशेखर आणि रामप्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यू नंतर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन संस्था पुन्हा उभारून हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे नाव दिले. ते या संस्थेचे सर चिटणीस झाले. त्यांनी क्रांतिवीर लाल लजपत राय यांच्या मृत्यूचे बलिदान घेण्यासाठी 1928 मध्ये आपल्या एका साथीदारांसह मिळून सॅंडर्सची हत्या केली. त्यांना ब्रिटिश पोलिसांनी अटक केली त्यातून ते पळून गेले. त्यांना अनेकदा स्वातंत्र्य लढाच्या चळवळीत अटक करण्यात आली. त्यांचे निश्चय होते. की  प्राण गेले तरी चालेल पण इंग्रजांच्या हाती लागायचे नाही. म्हणून चंद्रशेखर आझाद 27 फेब्रुवारी रोजी अलाहाबाद येथे आल्फ्रेड पार्कात एका क्रांतिकारीला भेटण्यासाठी गेले असता. ब्रिटिश पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी पार्कांच्या भोवती वेढा घातला. या घटनेत पोलिसांमध्ये आणि त्यांच्यात गोळीबार झाला. या गोळीबारात ते एकटेच लढत होते. त्यांनी तीन ते चार पोलिसांना ठार केले. आता त्यांच्या बंदुकीत शेवटची गोळीच उरली होती. त्यांनी ती गोळी स्वतःला मारून घेतली आणि त्यांच्या इच्छेनुसार, शेवट्पर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाही. अशा प्रकारे त्यांनी देशाला स्वातंत्र्य करण्याच्या लढाईत आपल्या प्राणांचे बलिदान आले.