1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (12:50 IST)

बाल विवाह दुष्प्रभाव Child Marriage Effects

प्राचीन काळात काही त्या काळातील आवश्यकतेनुसार परंपरा आणि रीतीभाती तयार करण्यात आल्या होत्या. परंतु वर्तमान काळात आंधळे अनुकरण अजूनही बाल विवाह सारख्या कुप्रथा आमच्या देशात चालनात आहे.
 
लहान मुलं-बाळं शाळेत किंवा खेळताना अधिक शोभून दिसतात, या वयात त्यांना विवाह मंडपात बसून एक महत्वपूर्ण संस्कार सम्पन्न करवणे, जेव्हाकि त्यांना याबद्दल कुठलीही कल्पना देखील नसते, आधुनिक भारतीय समाजात कलंक प्रमाणे आहे.
 
या गैरव्यवहारामुळे मुला-मुलींवर पुढील दुष्परिणाम होतात- 
मुलांच्या मानसिक विकास अवरुद्ध होतो.
त्यांचं बालपण हिरावून घेतलं जातं.
विशेष करुन मुलींचं कमी वयात लग्न लावून दिल्याने उच्च शिक्षण प्राप्त करण्यात अडचणी येतात.
कमी वयात विवाह झाल्याने मुलींच्या आरोग्यावर विपरीत प्रभाव पडतो. त्या लहान वयात गर्भवती होतात ज्याने शारीरिक आणि मनोवैज्ञानिक समस्या उत्पन्न होतात. कुपोषण, अधिक कार्यभार, अशिक्षा, यौन व्यवहाराबद्दल अजाणता या सर्वांमुळे गर्भवती मुलींचा जीव धोक्यात येऊ शकतो.
त्या अपरिपक्व गर्भधारणा, लैंगिक संक्रमित रोग आणि एड्स सारख्या आजारांना बळी पडतात. तसेच यातील अधिक मुले कुपोषणाला बळी पडतात. त्यांचे वजन कमी असल्याचा भीती तसेच मृत्यूचा धोका जास्त आहे.
तरुण वयात कुटुंबाची जबाबदारी मुलीवर येऊन पडते. त्यामुळे त्यांचा पूर्ण मानसिक आणि शारीरिक विकास थांबतो.
काही वेळा मुली बालविधवा होतात. ज्याला आयुष्यभर या शापातून मुक्ती मिळत नाही, आणि त्यांना संपूर्ण आयुष्य दु:खात घालवावं लागतं.
अनेक वेळा मुलं मोठी होऊन चांगला व्यवसाय किंवा नोकरी करतात. लहान वयात केलेल्या बायकोला सोडून ते नवीन लग्न करतात. अशा परिस्थितीत त्या मुलीला अडचणींचा सामना करावा लागतो.
बालविवाहामुळे लोकसंख्या वाढते आणि लोकसंख्या वाढीचे परिणाम देशाला व समाजाला भोगावे लागतात.
बालविवाहामुळे माता मृत्यू दर आणि बालमृत्यूचे प्रमाणही वाढते.