मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

15 सेकंदात 50 अंडी फस्त (Video)

China man drank 50 raw eggs in 15 seconds
अनेक लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी वाट्टेल ते करण्यास तयार असतात. हे करताना प्रसंगी जीवावर बेतण्याची शक्यता असते. तरीही ते अशा प्रसंगांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियाच्या काळात तर हे अधिकच सोपे बनले आहे. यायाच प्रत्यय नुकताच चीनमध्ये आला. यामध्ये एका तरूणाने अवघ्या 15 सेकंदांत 50 अंडी खाण्याचे धाडस दाखवले.
 
50 अंडी ती सुद्धा अवघ्या 15 सेकंदांत फस्त केली, हे काहीसे न पटणारे असले तरी असे धाडस चीनमधील एका तरूणाने केले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो तरूण कच्ची अंडी फोडून पीत होता. त्याने केवळ 15 सेकंदांत तब्बल 50 अंडी गट्टम केल्याचे या व्हिडिओत दिसते.
50 अंडी फोडून त्यातील पातळ पदार्थ मोठ्या पाच मगमध्ये ठेवण्यात आले होते. या महाभागाने अवघ्या 15 सेकंदांत सर्वच्या सर्व 5 मग एकापाठोपाठ रिकामे केले. या संबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलेला असून आतापर्यंत लाखों लोकांनी तो पाहिला आहे.