आई हेच आपले खरे दैवत

mothers day wishes
Last Modified बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (17:53 IST)
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द किती सहजपणे आपण उच्चारतो पण त्या शब्दामागे दडलेली असते ती फक्त आणि फक्त माया, वात्सल्य.
आई ही खरं तर शब्दात मांडणे फार कठीण आहे. असे म्हणतात की 'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी' हे तंतोतंत खरे आहे.

आपल्या जवळ सर्व काही आहे संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे पण डोक्यावर मायेचा हात फिरवणारी आईच नाही तर सर्व काही व्यर्थ आहे. बाळाला जन्म देणारी आई ही देवाचे रूप आहे. असे म्हणतात की देव सर्वत्र येऊ शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली.

आपल्या सर्व कुटुंबाची काळजी घेणारी, कोणाला काय हवं काय नको, सर्वांचे मन जपणारी, त्यांच्याकडे लक्ष देणारी आई सर्वांसाठी झटते, राब राब राबत असते.

सर्वांसाठी चांगले अन्न शिजवते. मुलांना संस्काराची शिदोरी देते. कुटुंबीयांचा मागे खंबीरपणे उभारून आलेल्या परिस्थितीला तोंड देणारी सुद्धा आपली आईच असते.

आई ही बाळाची पहिली गुरु मानली जाते. बाळाला योग्य मार्ग दाखवते आणि वेळो-वेळी आपले मार्गदर्शन करते. मुलांच्या चुकीला सुधारते. शिस्तबद्धता, विश्वास ठेवणं, सगळ्यांचा आदर करणं मग तो मोठा असो किंवा लहान, शिकवते आणि समाजात एक चांगले व्यक्तिमत्त्व घेऊन जगणे शिकवते. वेळ पडल्यास मुलांना चांगले घडविण्यासाठी तिला आपले कर्तव्य पार पडताना कठोर बनावे लागतं.
आई ही एका वृक्षाप्रमाणे असते जी आपल्याला मायेची सावली देते. आपल्याला काही दुखापत झाली किंवा आपण अडचणीत असलो की आपल्या ओठांवर सर्वात पहिले नाव येते ते आईच असते. आपल्या कुटुंबातील सदस्य आजारी पडल्यावर आईच दिवसरात्र एक करून त्यांची काळजी घेते. आपल्या मुलांना घडविण्यात आईचा मोलाचा वाटा असतो. याचे प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला आई जिजाऊने शिवाजी महाराजांना दिलेल्या शिकवणी ने दिसून येते. शिवबा यांना स्वराज्याची शिकवण आई जिजाऊ यांनीच दिली होती. महात्मा गांधी यांच्या मनात देखील सत्याग्रहाचा धडा त्यांच्या आईनेच शिकवला. आचार्य विनोबांना भूदानाची कल्पना त्यांच्या आईच्या शिकवणीतूनच मिळाली.
आई अशी व्यक्ती आहे जी अगदी निस्वार्थपणे आपल्या मुलाचे संगोपन करते. त्यांना चांगले घडविण्यासाठी धडपड करत असते आणि ती पण कोणत्याही परतफेडाची अपेक्षा न बाळगता. आई हा मायेचा सागर आहे त्यामधून आपल्या मुलांसाठी माया ओसंडून वाहत असते. या जगात आईची तुलना कोणाशी ही करता येणं अशक्यच आहे आणि तिची तुलना कोणाशी करूही नये.

असे म्हणतात की मुलांचे यश आणि अपयश त्यांच्या मिळालेल्या संस्कारावर अवलंबवून असत. पण

आजच्या जगात अशी मुलं देखील आहेत जी लहान पणी तर चांगली संस्कारी असतात. पण मोठी झाल्यावर आपल्या वयोवृद्ध आई वडिलांना ओझं समजतात आणि काही स्वार्थी लोक असे ही असतात जे आपल्या स्वार्थासाठी आपल्या आईची पाठवणी थेट वृद्धाश्रमात करतात. असे करणं सरासर चुकी चे आहे. असे अजिबात करू नये. आपण आपल्या वृद्ध आईची सेवा करावी. कारण तिने जे आपल्यासाठी केलेले आहे त्याचे ऋण आपल्यासाठी फेडणे या जन्मात तरी अशक्य आहेत. पण काही मुलं पैशाच्या रूपाने ते ऋण परत फेडू बघतात. पण मुलांना हे माहिती नसत की म्हातारपणी आईला कसलीही अपेक्षा नसते. ती फक्त आपल्या मुलांच्या प्रेमाच्या सावलीत विसावा घेण्यासाठी आसुसलेली असते.

आपल्याला आपल्या आईचा सांभाळ करायला हवा. कारण कोणत्याही धनसंपत्तीची तिला अपेक्षा नसते. ती भुकेली असते ती फक्त प्रेमाची. आपल्याला आपल्या आईला आदर द्यायलाच पाहिजे. कारण आई नाही तर आपले अस्तित्वच नाही. आई नाही तर काहीच नाही. कारण आईसारखे दैवत साऱ्या जगात नाही. वात्सल्य मूर्ती असणाऱ्या जगातील सर्व मातांना कोटी-कोटी प्रणाम आणि मानाचा मुजरा.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

यशवंत मनोहर: 'सरस्वती ऐवजी सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा का ...

यशवंत मनोहर: 'सरस्वती ऐवजी सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा का नाही?'
प्रसिद्ध कवी आणि विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यासपीठावर सरस्वतीची प्रतिमा ठेवल्याने ...

धनंजय मुंडे यांच्या ऐवजी महिला राजकारणी असती, तर समाजाने ...

धनंजय मुंडे यांच्या ऐवजी महिला राजकारणी असती, तर समाजाने काय केलं असतं?
धनंजय मुंडेंवर एका महिलने बलात्काराचे आरोप केलेत. या आरोपांना उत्तर देताना त्यांनी त्या ...

कुंभमेळ्यात मोजून डुबक्या मारता येणार, पोलिस ठेवणार नजर

कुंभमेळ्यात मोजून डुबक्या मारता येणार, पोलिस ठेवणार नजर
कुंभमेळ्याला सुरुवात झालीय. यामध्ये गंगेमध्ये जाऊन स्नान करणाऱ्या भाविकांनी तीन डुबक्या ...

दहावीचा अभ्यासक्रम निम्मा करा - मुख्याध्यापक, शिक्षक ...

दहावीचा अभ्यासक्रम निम्मा करा - मुख्याध्यापक, शिक्षक संघटनेची मागणी
कोरोनाच्या साथीमुळे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने ...

पुण्यातल्या बँकेवर ईडीचा छापा, राष्ट्रवादीचे आमदार अनिल ...

पुण्यातल्या बँकेवर ईडीचा छापा, राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना अटक
पुण्यातल्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर ईडीने छापा टाकला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ...