सर्व दानात श्रेष्ठ असें हे नेत्रदान
सर्व दानात श्रेष्ठ असें हे नेत्रदान,
ज्याने दूर होतो अंधार, कार्य हे महान, अंधारं जग उजळतं एका क्षणात,
सुंदर ही सृष्टी दिसू लागते निमिषात,
रंग खेळू लागतात समोर क्षणार्धात,
स्पर्शा पेक्षा काहीतरी वेगळं येतं लक्षात,
किमया घडते बरं ही सारी ह्या दाना नं,
खूप काही मिळतं आपल्या या देण्यानं,
काय हरकत आहे मग असं तेजस्वी दान करायला!
मरणा नंतर ही दुसऱ्याच्या डोळ्याचं तेज होऊन जगायला!
अश्विनी थत्ते. ......