शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 5 सप्टेंबर 2017 (16:36 IST)

अबब 57 लाख वर्षांपूर्वीच्या माणसाच्या पावलाचे ठसे सापडले

ग्रीसच्या एका बेटावर तब्बल 57 लाख वर्षांपूर्वीच्या माणसाच्या पावलाचे ठसे शोधले आहेत. वेस्टर्न क्रेटमध्ये ट्रॅक्‍लोस येथे संशोधकांना हे पायाचे ठसे आढळले आहेत.

याआधी आफ्रिकेत 8 लाख वर्षांपूर्वीचे मानवी जीवाश्म सापडलेले आहेत. मात्र त्यापेक्षाही पुरातन असे हे पावलांचे ठसे आता ग्रीसच्या बेटावर सापडले असल्याने याबाबत नव्याने संशोधनाची गरज निर्माण झाली आहे. स्वीडनच्या उप्पसाला युनिव्हर्सिटीतील पी. अल्बर्ग यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हे पदचिन्ह स्पष्टपणे माणसाचेच असून ते अत्यंत पुरातन काळातील आहेत. या पावलातील बोटांचे ठसेही सुस्पष्ट आहेत. पावलाचा आकार, अंगठा आणि बोटे यांची रचना मानवी पावलाचे स्पष्ट संकेत देतात. या संशोधनामुळे मानवी विकासाच्या सध्याच्या प्रचलित समजाला छेद मिळू शकतो.