अनसूया साराभाई यांच्या १३२ व्या जन्मदिना निमित्त गुगलने डुडल तयार केले आहे. त्यांचा जन्म १८८५ मध्ये अहमदाबाद येथे झाला. अनुसूया साराभाई या भारतातील विणकर आणि महिला कामगारांच्या आंदोलनातील प्रमुख होत्या. त्यांनी अहमदाबाद येथे मजूर महाजन संघाची स्थापना केली होती. ही टेक्स्टाईल कामगारांचा सर्वात जुनी संघटना आहे.
एका श्रीमंत आणि व्यावसायिक कुटुंबात अनुसया साराभाई यांचा जन्म झाला. लहानपणीच त्यांच्या आइॅ वडिलांचे छत्र हरवले. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला जो अयशस्वी ठरला. त्यानंतर १९१२ मध्ये त्या इंग्लंडला मेडिकल डिग्री घेण्यासाठी गेल्या पण अभ्यासक्रमाचा भाग असलेले प्राण्यांचे विच्छेदन हे त्यांच जैन धर्मात मान्य नाही. म्हणून त्यांनी लंडन स्कूल ऑक इकॉमिक्समधून शिक्षण घेतले.
भारतात परत आल्यानंतर त्यांनी महिला आणि समाजातील गरीब वर्गासाठी काम करायला सुरुवात केली. जेव्हा त्यांनी कापड गिरणी मध्ये का करणाऱ्या महिलांना पाहिले तेव्हा त्यांनी कामगार आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १९१४ मध्ये कामगारांना संघटीत करण्याचे काम केले.