सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

माणसाने 22 हजार वर्षांपूर्वी द्राक्षे खाण्यास केली सुरुवात

माणसाने भातशेती कधी सुरु केली किंवा ती कुठे सुरु केली, याबाबतचे एक संशोधन अलीकडेच झाले आहे. आता माणसाने द्राक्षे खाण्यास कधी सुरुवात केली याबाबतचे संशोधन करण्यात आले आहे. उत्तर अमेरिका आणि युरोपच्या बहुतांश भागातून ज्यावेळी बर्फाचे साम्राज्य हट गेले त्यावेळी द्राक्षांचे उत्पादन वाढू लागले आणि माणसाने त्यांचा आहारात वापर सुरु केला. असे या संशोधकांचे म्हणणे आहे. ज्या काळात द्राक्षाचा वापर माणसाने शेतातील पिकांसारखा सुरु केला. त्यापूर्वी किमान पंधरा हजार वर्षे आधीच माणसाने या फळाची चव चाखण्यास सुरुवात केली होती.
 
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे ब्रँडन गॉट यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, बहुतांश पिकांप्रमाणेच द्राक्षांची शेतीही समारे सात ते दहा हजार वर्षांपूर्वी सुरु झाली. मात्र, त्यावेळेपासूनच माणसाच्या आहारात द्राक्षे आले असे नव्हे. त्यापूर्वी अनेक वर्षांपासून माणसाला द्राक्षांची चव माहिती होती. द्राक्षांची शेती सुरु होण्यापूर्वी अनेक शतके आधीच जंगलात नैसर्गिकरित्या निर्माण होणार्‍या द्राक्षांचा माणसाने खाण्यासाठी वापर करण्यास सुरुवात केली होती.