संबंधित माहिती
- उन्हाळ्यातील कुलर ने घेतला आजोबा आणि नातवाचा जीव
- World Suicide Prevention Day 2022:आत्महत्या करणार्या लोकांमध्ये ही लक्षणे आधीच दिसतात, त्यांना वेळीच ओळखा
- International Literacy Day 2022 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कधी आणि का साजरा केला जातो? इतिहास, महत्त्व आणि थीम जाणून घ्या
- Mother Teresa's death anniversary : मदर तेरेसा पुण्यतिथी
- शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक का म्हणतात
Grandparents Day आपल्या सर्व आजी-आजोबांना समर्पित!!
नातवंड म्हणजे चीज असतं सँडविचमधलं
आजी आजोबा यांच्यामध्ये दडलेलं
नातवंड म्हणजे काय चीज असते
आई रागावली की आजीकडे धाव घेते.....
नातवंड म्हणजे लोण्याचा गोळा
पाळण्यातून अलगद काढून घ्यावा...
नातवंड म्हणजे गुलाबाची पाकळी
पुस्तकात जपलेली पानावरची जाळी.
नातवंड म्हणजे विड्यातला गुलकंद
सगळ्या चवींना बांधतो एकसंध...
नातवंड म्हणजे खव्याचा पेढा
अखंड आनंद घ्या हवा तेवढा...
नातवंड म्हणजे त्रिवेणी संगम
तिस-या पिढीचा असतो उगम...
नातवंड म्हणजे आनंद तरंग
आनंदाच्या डोहात डुंबते अंतरंग...
आपल्या सर्व आजी-आजोबांना समर्पित!!
