testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बेटिक आयआयटी-मुंबई यांच्यातर्फे ‘मेधा’ २०१९' या मेडिकल डिव्हाइस हॅकेथॉनचे आयोजन

iit betic
Last Modified गुरूवार, 13 जून 2019 (11:26 IST)
वैद्यकीय गरजा भागविणाऱ्या कल्पक उपकरणांच्या नवनिर्मितीसाठी प्रेरणा देण्यासाठी आयआयटी मुंबईतील, बायोमेडिकल इंजिनीअरिंग अँड टेक्नोलॉजी इनक्युबेशन सेंटर (‘बेटिक’), सीओई पुणे आणि व्हीएनआयटी नागपूरयांच्यातर्फे मेडिकल डिव्हाइस हॅकेथॉन अर्थात मेधा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने डॉक्टर आणि इंजिनीअर्स एका व्यासपीठावर एकत्र येऊन नावीन्यपूर्ण उपकरणांची निर्मिती करतात. २०१४सालापासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

या स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक वैद्यकीय क्षेत्रातील आव्हानांचे व्हिडियो पाहतात आणि एकत्रितपणे काम करून उपाययोजनेची निर्मिती करतात.
प्रत्येक पथकात डॉक्टर्स, डिझायनर्स आणि इंजिनीअर्स (मेकॅनिकल वइलेक्ट्रॉनिक्स) यांचा समावेश आहे. ते विचारमंथन करून, आराखडे काढून प्रोटोटाईप्स तयार करतात. आघाडीच्या नवनिर्मात्यांना त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रगत प्रशिक्षण व फेलोशिप प्राप्त करण्याची संधी मिळते.आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये ‘मेधा'ची ८ पर्वे आयोजित करण्यात आली आहेत.
यंदा ‘बेटिक’, मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट ऑफ टेस्टिंग, रिसर्च अँड ट्रेनिंग, पुण्यातील व्हेंचर सेंटर आणि नागपूरमधील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग या संस्थांमध्ये जुलैमधील शनिवार-रविवारी ‘मेधा’चेआयोजन करणार आहे.

"पूर्तता न झालेल्या गरजा मांडणारे डॉक्टर्स आणि आरोग्यसेवा क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक इंजिनीअर्स यांना ‘मेधा’ एकत्र आणते. ते निदान किंवा उपचारासाठी नवीन वैद्यकीय उपकरणांच्या ठोस संकल्पना तयार करतात. याकल्पनांवर ‘बेटिक’च्या विविध केंद्रांमध्ये पुढे काम होते किंवा उत्पादने विकसित करण्यास तसेच त्यात रस असलेल्या संस्था त्यांना स्टार्टअप कंपनीद्वारे बाजारात आणण्याचे किंवा परवाने घेऊन उद्योगात आणण्याचे काम करतात.गेल्या चार वर्षांत आमच्या टीम सदस्यांनी ५० पेटंट्स फाईल केली आणि त्यातील १२ संकल्पनांसाठी परवाने मिळाले आहे. या संकलप्ना स्टार्टअप्स किंवा प्रस्थापित उद्योगांच्या माध्यमातून वास्तवात येणार आहेत. यातील अनेककल्पनांचे उगमस्थान ‘मेधा’ होती,” असे ‘बेटिक’चे संस्थापक प्राध्यापक बी. रवी म्हणतात.

इच्छुक उमेदवारांना २५ जून २०१९पूर्वी ‘बेटिक’च्या वेबसाईटवर पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना त्यांचा बायो-डेटा, सृजनात्मक कामाचा पोर्टफोलिओ अपलोड करावा लागेल. त्या आधारे त्यांना शॉर्टलिस्ट केलेजाईल, मुलाखती घेतल्या जातील आणि निवड होईल. निवडलेल्या उमेदवारांनी १००० रुपयांची नॉन-रिफंडेबल फी भरणे आवश्यक आहे.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

धनंजय मुंडे भाऊ-बहिणीच्या नात्याची जाणीव ठेवायला हवी होती

धनंजय मुंडे भाऊ-बहिणीच्या नात्याची जाणीव ठेवायला हवी होती
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी ...

PMC बँक: ठेवीदारांची आर्त मागणी, 'माझा भाऊ मरण्याआधी पैसे ...

PMC बँक: ठेवीदारांची आर्त मागणी, 'माझा भाऊ मरण्याआधी पैसे द्या'
19 ऑक्टोबर 2019. महाराष्ट्रात प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं सगळेच राजकीय पक्ष शेवटचा ...

मतदानाला जाताय मग ही अकरा पैकी एक ओळखपत्र सोबत ठेवा

मतदानाला जाताय मग ही अकरा पैकी एक ओळखपत्र सोबत ठेवा
आज होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी आवश्यक ...

राज्यात मतदानासाठी वापरात आहेत 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट ...

राज्यात मतदानासाठी वापरात आहेत 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट मशीन
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट (मतदार ...

सैन्य दलातील जवानाची आत्महत्या मात्र सोशल मिडीयावर शहीद ...

सैन्य दलातील जवानाची आत्महत्या मात्र सोशल मिडीयावर शहीद म्हणून पोस्ट व्हायरल
चांदवड तालुक्यातील सैन्य दलातील भरवीर येथील अर्जुन प्रभाकर वाळुंज याने झाडाला गळफास लावून ...