शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : शुक्रवार, 28 एप्रिल 2023 (23:20 IST)

अंतरराष्‍ट्रीय नृत्य दिवस : लय, ताल, भाव, संगीत अंग ज्याचे

लय, ताल, भाव, संगीत अंग ज्याचे ,
नटराजचे पूजन नित्य, कलेला जीवन समर्पण त्याचे,
कलेचा हा सुंदर सा विलोभनीय आविष्कार,
निपुण नृत्यांगना करती, नृत्य साकार,
प्रत्येक शैली पारणे फेडी डोळ्याचे,
अदभूत निष्ठा, कठीण परिश्रम मिश्रण त्याचे,
पिढ्यां न पिढ्या रमती साधनेत नृत्याच्या,
कलेस देव मानिती, लिन पायी नटराजच्या,
कोणतेही नृत्य असो, प्रयत्नांची पराकाष्ठा लागते,
कलेप्रती ची आसक्ती अन निष्ठाच कलाकारांस तारते!
..अश्विनी थत्ते