शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 16 डिसेंबर 2020 (18:54 IST)

आपला प्रवास खूप छोटा आहे

आपला जीवनप्रवास खूप छोटा आहे
एक तरुण महिला एका बसमध्ये बसली होती. पुढच्याच स्टॉपमध्ये एक जाड आणि थोराड वयस्क बाई आल्या आणि तिच्याजवळ बसल्या. जास्तीत जास्त आसन तिने व्यापले आणि तिच्या सोबत तिने मोठाल्या पिशव्या पण आणल्या होत्या. त्यांनी पण खूप जागा व्यापली. 
 
त्या तरुणीच्या दुसऱ्या बाजूस बसलेला तरुण अस्वस्थ झाला. तो  तिला म्हणाला की "तू काहीच का बोलत नाहीस?"
तरुणीने स्मित करून प्रतिसाद दिला- "अनावश्यक किंवा वायफळ काहीतरी बोलण्यात काहीच अर्थ नाही.  आपला एकत्र प्रवास खूपच छोटा आहे. मी पुढच्याच स्टॉपवर उतरणार आहे."
ही प्रतिक्रिया सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिली जाण्यासाठी पात्र आहे.
"इतक्या नगण्य गोष्टींवर भांडण करणे आवश्यक नाही, आपला प्रवास खूपच छोटा आहे" 
आपल्यापैकी प्रत्येकाने हे जाणले पाहिजे की, आपल्याला इथे वेळ  इतका कमी आहे; की त्या वेळात भांडणे, निरर्थक वादविवाद करणे, इतरांना क्षमा न करणे, असमाधानीपण आणि दोष शोधण्याची वृत्ती म्हणजे वेळ आणि ऊर्जेचा अपव्यय आहे.
कोणी आपले मन दुखावलंय का? 
शांत राहा, प्रवास खूप कमी आहे
कुणी तुमचा विश्वास घात केला आहे का? तुम्हाला फसवलंय का?
सोडून द्या, शांत राहा, प्रवास खूप कमी आहे
कुणीही तुम्हाला त्रास दिला असल्यास, लक्षात ठेवा की, हा प्रवास किती मोठा किंवा छोटा आहे हे कुणालाच माहीत नाही. त्यांचा प्रवास कधी संपणार आहे ते कुणालाही माहीत नाही.
आपला प्रवास खूप कमी आहे.
आपण मित्रमंडळी आणि नातेवाईक यांची कदर करूया. आपण एकमेकांचा आदर करू, एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागूया. 
भूता परस्परे जडो। मैत्र जीवांचे।। 
 
जर मी तुम्हाला अनावधानाने कधी दुखावले असेल तर मला माफ करा.
जर तुम्ही मला कधी दुखावले असेल तर मी ते कधीच सोडून दिले आहे. 

-सोशल मीडिया