शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 16 डिसेंबर 2020 (14:03 IST)

1971च्या युद्धात पाकिस्तानवर भारताने मिळवलेल्या विजयाचा ‘विजय दिवस’

विजय दिवस 16 डिसेंबर 1971च्या युद्धात पाकिस्तानवर भारताने मिळवलेल्या विजयामुळे साजरा केला जातो. या युद्धानंतर 93,000 पाकिस्तानी सैन्यांनी आत्मसमर्पण केले होते. वर्ष 1971च्या युद्धात भारताने पाकिस्तानला जोरदार शिकस्त दिली, त्यानंतर पूर्वी पाकिस्तान आझाद झाला, जो आज बांगलादेशाच्या नावाने ओळखला जातो. हे युद्ध भारतासाठी ऐतिहासिक आणि प्रत्येक देशवासीच्या मनात उत्साह आणणारा साबीत झाला आहे.  
 
देशभरात 16 डिसेंबर रोजी 'विजय दिवस'च्या रूपात साजरा केला जातो. वर्ष 1971च्या युद्धात किमान 3,900 भारतीय सैनिक शहीद झाले होते, जेव्हा 9,851 जखमी झाले होते. पूर्वी पाकिस्तानात पाकिस्तानी दलांचे कमांडर लेफ्टिनेंट जनरल एके नियाजी यांनी भारताचे पूर्वी सैन्य कमांडर लेफ्टिनेंट जनरल जगजित सिंह अरोरा यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले होते, ज्यानंतर 17 डिसेंबर रोजी 93,000 पाकिस्तानी सैनिकांना युद्धबंदी बनवले होते.
 
युद्धाची पृष्‍ठभूमि वर्ष 1971च्या सुरुवातीपासूनच बनू लागली होती. पाकिस्तानचे सैनिक तानाशाह याहिया ख़ां याने 25 मार्च 1971 ला पूर्वी पाकिस्तानच्या जनभावनांना सैनिक ताकदीने मिटवण्याचे आदेश दिले होते. यानंतर शेख मुजीबला अटक करण्यात आले. तेव्हापासून बरेच शरणार्थी भारतात येऊ लागले. जेव्हा भारतात पाकिस्तानी सेनेच्या दुर्व्यवहाराची बातमी समोर आली, तेव्हा भारतावर असा दबाव पडू लागला की त्याने तेथे लष्करांच्या माध्यमाने हस्तक्षेप करावा. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची इच्छा होती की एप्रिलमध्ये आक्रमण केले पाहिजे. याबद्दल इंदिरा गांधी यांनी थलसेनाध्‍यक्ष जनरल मानेकशॉ यांचे मत घेतले.  
 
तेव्हा भारताजवळ फक्त एक पर्वतीय डिवीजन होता. या डिवीजनजवळ पुल बनवण्याची क्षमता नव्हती. तेव्हा मान्सूनचे आगमन होणार होते. अशात पूर्वी पाकिस्तानात प्रवेश करणे मुसीबत घेण्यासारखे होते. मानेकशॉ ने सियासी दबावात न झुकता पंतप्रधान इंदिरा गांधी यांना स्पष्ट सांगितले की त्यांना पूर्ण तयारीने युद्धाच्या मैदानात उतण्याची इच्छा आहे. 
 
3 डिसेंबर, 1971 ला इंदिरा गांधी तत्कालीन कलकत्तेत एक जनसभेला संबोधित कर होत्या. याच दिवशी संध्याकाळी पाकिस्तानी वायुसेनेच्या विमानांनी भारतीय वायुसीमेला पार करून पठानकोट, श्रीनगर, अमृतसर, जोधपुर, आगरा इत्यादी सैनिक हवाई अड्डांवर बॉम्बं हल्ला करणे सुरू केले. इंदिरा गांधी यांनी त्याच वेळेस दिल्लीत परतून मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक घेतली.
 
युद्ध सुरू झाल्यानंतर आधी तीव्र गतीने पुढे वाढत असलेले भारतीय सेनेने जेसोर आणि खुलनावर कब्जा केला. भारतीय लष्कराची रणनीती होती की मुख्य ठिकाणांना सोडत आधी पुढे जायला पाहिजे. युद्धात मानेकशॉ खुलना आणि चटगांववर देखील कब्जा करण्यासाठी जोर देत राहिले. ढाकावर कब्जा करण्याचे लक्ष्य भारतीय सेनेसमोर ठेवण्यात आलेच नाही. या युद्धाच्या दरम्यान एकदा परत इंदिरा गांधी यांचे विराट व्यक्तित्व समोर आले. युद्ध दरम्यान इंदिरा गांधी यांनी कधीही विचलित होताना बघितले नाही.
 
14 डिसेंबर रोजी भारतीय सेनेने एक गुप्त संदेशाला पकडले की दुपारी 11 वाजता ढाकाच्या गवर्नमेंट हाउसमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे, ज्यात पाकिस्तानी प्रशासनाचे मोठे अधिकारी भाग घेणार आहे. भारतीय सेनेने निश्चित केले की त्याच वेळेस भवनावर बॉम्बं हल्ला केला पाहिजे. 
 
बैठकीच्या दरम्यान मिग 21 विमानांनी भवनावर बॉम्बं हल्ला करून मुख्य हॉलची छत उडवून दिली. गवर्नर मलिकने थरथरीत हाताने आपला राजीनामा लिहिला.
 
16 डिसेंबरच्या पहाटे जनरल जैकब यांना मानेकशॉ यांचा संदेश मिळाला की आत्मसमर्पणाच्या तयारीसाठी लगेचच ढाका पोहचा. जैकब यांची हालत बिघडत होती. नियाज़ीजवळ ढाकामध्ये 26400 सैनिक होते, जेव्हाकी भारताजवळ फक्त 3000 सैनिक आणि ते देखील ढाकापासून 30 किलोमीटरच्या अंतरावर.
 
भारतीय सेनेने युद्धावर पूर्णपणे आपली पकड बनवून घेतली. अरोरा आपल्या दलबल समेत एक दोन तासास ढाका लँड करणार होते आणि युद्ध विराम देखील लवकरच संपणार होता. जैकबच्या हातात काहीच नव्हते. जैकब जेव्हा नियाज़ीच्या खोली शिरले तेव्हा तेथे सन्नाटा होता. आत्म-समर्पणाचे दस्तावेज टेबलावर ठेवलेले होते.
 
संध्याकाळी साडेचार वाजता जनरल अरोरा हेलिकॉप्टरहून ढाका हवाई अड्ड्यावर उतरले. अरोरा आणि नियाज़ी एका टेबलावर बसले आणि दोघांनी आत्म-समर्पणाच्या दस्तावेजावर हस्ताक्षर केले. नियाज़ीने आपले बिल्ले काढले आणि आपला रिवॉल्वर जनरल अरोरा यांच्या हवाले केला. नियाज़ी यांच्या डोळ्यात एकदा परत अश्रू आले. अंधार झाल्यावर स्थानीय लोक नियाज़ी यांची हत्या करण्याच्या प्रयत्नात होते. भारतीय सेनेचे वरिष्ठ अफसरांनी नियाज़ी यांच्या चारीकडे एक सुरक्षित घेरा बनवला. नंतर नियाजी यांना बाहेर काढले.
 
इंदिरा गांधी संसद भवनात आपल्या ऑफिसात एक टीव्ही इंटरव्यू देत होत्या. तेवढ्यात जनरल मानेक शॉ यांनी त्यांना बांगलादेशात मिळालेल्या विजयाची बातमी दिली.
 
इंदिरा गांधी यांनी लोकसभेत घोषणा केली की युद्धात भारताला विजय मिळाला आहे. इंदिरा गांधी यांच्या या विधानानंतर पूर्ण सदन आनंदात डुबला. या ऐतिहासिक विजयाचा आनंद आज प्रत्येक देशवासीच्या मनात उत्साह भरून देते.