रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 24 जानेवारी 2023 (09:10 IST)

National Girl Child Day 2023 :राष्ट्रीय बालिका दिवस महत्त्व आणि उद्दिष्टये

kid
24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस भारतात साजरा केला जातो. याची सुरुवात 2008 मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाने केली होती. 24 जानेवारी हा दिवस बालिका दिन साजरा करण्यासाठी निवडण्यात आला कारण याच दिवशी 1966 मध्ये इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये मुलींचा बचाव करणे, त्यांना निरोगी आणि सुरक्षित वातावरण देणे यासह जनजागृती कार्यक्रमांचा समावेश आहे. हा दिवस साजरा करण्यामागे मुलींना त्यांच्या हक्कांची समाजात जाणीव करून देणे हा आहे. 
 
राष्ट्रीय बालिका दिनाचे उद्दिष्ट
समाजात समानता आणण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय बालिका दिन सुरू केला होता. या मोहिमेचा उद्देश मुलींना जागृत करून समाजाच्या जडणघडणीत महिलांचे समान योगदान आहे हे सांगणे हा आहे. यामध्ये सर्व स्तरातील लोकांचा समावेश करून निर्णय घेण्याचा अधिकार मुलींनाही असायला हवा, याची जाणीव करून देण्यात आली. याशिवाय हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लैंगिक असमानतेबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि प्रत्येक मुलीला मानवी हक्क मिळतील याची खात्री करणे हा आहे.
 
राष्ट्रीय बालिका दिन का साजरा केला जातो?
समाजातील मुलींचा दर्जा सुधारण्यासाठी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश मुलींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व आणि त्यांचे आरोग्य आणि पोषण याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणे हा आहे. आजही देशात मुलींना विषमता आणि लिंगभेदाला सामोरे जावे लागत आहे, अशा परिस्थितीत लोकांची विचारसरणी बदलून त्यांना जागरूक करण्यासाठी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.

Edited By- Priya Dixit