मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 1 मार्च 2018 (12:40 IST)

मृत्यूचा अनुभव घेण्यासाठी या मंदिरात होते गर्दी

पुनर्जन्म आहे किंवा नाही या संदर्भात अनेक ते व्यक्त होतात. पुनर्जन्म आहे असा विश्र्वास असणारे या संदर्भात अनेक कथा सांगतात. त्या किती खर्‍या, कितीखोट्या हे कुणीच सांगू शकत नाही मात्र जगात एक असाही देश आहे ज्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी पुनर्जन्म  ही संकल्पना कारणीभूत ठरली आहे. या देशाचे नाव आहे थायलंड. राजधानी बँकॉक पासून 60 मैलांवर असलेल्या प्रोमानी वाट या बुद्धंदिरात भाविकांच्या रांगा असतात मात्र या रांगा पुनर्जनचा म्हणजेच अगोदर मरणाचा अनुभव घेण्यासाठी लागतात. येथे पुनर्जन्म घेण्याची सोय केली जाते. अर्थात त्यासाठी खरेखुरे मरण्याची गरज नाही हे विशेष. येथे खोटेखोटे मरण्याचा अनुभव घेता येतो. जगात विविध देशात मृत्यूनंतर अनेक प्रकारची कर्मकांडे केली जातात. थायलंड मध्येही अशी कर्मकांडे होतात. या बुद्ध मंदिरात मृत्यूचा आणि त्यानंतर पुनर्जन्माचा अनुभव घेण्यासाठी जे कर्मकांड केले जाते त्यानंतर आपोआपच आपला पुनर्जन्म झालाय यावर विश्र्वास बसतोच. या अनुभवासाठी येथे 9 ताबूत असून ते रंगविलेले आहेत. भाविकाला यात झोपविले जाते. याचा अर्थ तुमचा सांकेतिक मृत्यू झाला. 90 सेकंद या अवस्थेत राहिल्यावर पुजारी भाविकाला उठवितो. त्यानंतर भाविकाने उभे राहून प्रार्थना करायची की त्याचा पुनर्जन्म  झाला असे समजतात. अर्थात या अनुभवासाठी लाखो रुपये मोजावे लागतात.