रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : बुधवार, 11 जानेवारी 2023 (21:34 IST)

राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी 2023 Rajmata Jijabai speech in marathi

rajmata jijau
12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची तारखेनुसार जयंती आहे. माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईचं असू शकतात. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेची बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला तसेच बालपणापासून त्यांना तयार केले.त्यांच्या जयंती निमित्त महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ या. 
 
12  जानेवारी 1598 रोजी  छत्रपती शिवाजी महाराज यांचा मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळ देऊळगाव या ठिकाणी झाला. 
 
त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई असे . 
 
त्यांचा विवाह वेरूळचे मालोजी भोसले यांचे चिरंजीव शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला.
 
आई जिजाऊ यांनी शिवबाच्या जन्माच्या वेळी तुळजाभवानीला प्रार्थना केली होती की कुळाला, देशाला, धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र जन्माला येऊ दे.
 
राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.
 
राजमाता जिजाऊ यांनी लहानपणापासूनच शिवरायांवर रामायण आणि महाभारातचे संस्कार रुजवले.
 
वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी छत्रपती शिवबा यांचा हातात शहाजीराजांनी पुण्याची जहागीर सुपूर्द केली. 
 
आई जिजाऊ यांनी दिलेल्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्षानुवर्षे चालणारी गुलामगिरी मोडून काढली.  
 
स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला. 
 
राजमाता जिजाऊंमुळे महाराष्ट्राला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. 
 
न्याय निवाडा करण्याचे धडे महाराजांना मातेकडून प्राप्त झाले. जिजाबाई शिवाजी महाराजांच्या आद्यगुरू होत्या.
 
शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सुवर्णाचा क्षण पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसांतच 17 जून 1674 रोजी किल्ले राजगडजवळील पाचाड गावात राजमाता जिजाऊंचे निधन झाले.
 
जिजाऊ खरोखर आदर्श माता आहे. आपल्या मुलांना धैर्य, परोपकार, आत्मविश्वास, शौर्य, न्याय, निर्भय, राष्ट्र प्रेम या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्यात संस्कार देण्याचा सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये असतं. स्त्रीने आपली शक्ती ओळखून उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न केलेच पाहिजे.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त त्यांना मानाचा मुजरा .