शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 23 डिसेंबर 2020 (10:22 IST)

राष्ट्रीय ग्राहक दिन: ग्राहकाला मिळालेले सहा हक्क जाणून घ्या

दर वर्षी 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. भारतातील राष्ट्रपतीने 24 डिसेंबर इ.स.1986 रोजी या ग्राहक हक्क कायद्याला मंजुरी दिली होती. तेव्हा पासून हा दिन साजरा केला जात आहे. या कायद्याला अस्तित्वात राहण्यासाठी बऱ्याच संस्थेने प्रयत्न केले होते. या कायद्यानुसार ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहे. 
 
1 सुरक्षेचा हक्क
2 माहिती मिळविण्याचा हक्क 
3 निवड करण्याचा हक्क
4 मत मांडण्याचा हक्क
5 तक्रार आणि निवारण करण्याचा हक्क 
6 ग्राहक हक्काच्या शिक्षणाचा हक्क 
 
1 सुरक्षेचा हक्क - 
आपण जेव्हा एखादी वस्तू विकत घेतो त्या वस्तूच्या सुरक्षिततेची सर्वस्व जबाबदारी उत्पादकांची असते. वस्तू विकत घेताना त्या सुरक्षित असाव्यात आणि ग्राहकाच्या सुरक्षेची जबाबदारी विक्रेता कडे असावी नंतर त्या वस्तूच्या कंपनीची असावी. विक्रेताला हवे की त्यांनी नेहमी उच्च गुणवत्तेच्या वस्तूची विक्री करावी आणि काहीही तक्रार जाणवत असल्यास कंपनी कडे तक्रार करावी. ग्राहकांनी देखील नेहमी चांगल्या गुणवत्तेचे असलेले उत्पाद वापरावे. शक्यतो ISI ऍगमार्क चिन्हे आणि ISO प्रमाणित असलेले उत्पाद वापरावे. वस्तूची गुणवत्ता आणि त्याच्या मिळणाऱ्या सेवांबाबत ची माहिती मिळविण्याचा अधिकार ग्राहकाला आहे.

2 माहिती मिळविण्याचा हक्क -
या कायद्यानुसार ग्राहकाला उत्पादनाशी निगडित सर्व माहिती जसे की त्याची गुणवत्ता, प्रमाण, किंमत त्या मधील शुद्धता एक्स्पायरी डेट या सर्व बाबींची माहिती मिळविण्याचा हक्क आहे. 
 
3 निवड करण्याचा हक्क -
ग्राहकाला कोणत्या ही कंपनीच्या उत्पादनाला निवडण्याचा हक्क आहे. आज बाजारपेठेत हजारो च्या प्रमाणात कंपन्या आहे. त्यावर त्यांच्या योजना किंवा ऑफर देखील सुरू असतात. आपण बाजार पेठेत गेल्यावर जर विक्रेता किंवा व्यावसायिक आपल्याला एकाच ब्रॅण्डची वस्तू घेण्याचा आग्रह करीत असेल तर आपण त्याच्या विरोधात तक्रार करू शकता. 

4 मत मांडण्याचा हक्क -
प्रत्येक ग्राहकाला आपले मत मांडण्याचा हक्क आहे. ग्राहकाने विकत घेतलेल्या काही वस्तू मध्ये बिगाड झाले असल्यास किंवा वस्तू खराब असल्यास त्याच्या विरोधात आपले मत मांडण्याचा हक्क आहे. जर ग्राहकाला असे जाणवत आहे की त्याची फसवणूक झाली आहे तर तो त्या कंपनी किंवा त्या व्यावसायिक बद्दलची तक्रार ग्राहक तक्रार निवारण केंद्रात करू शकतो आणि आपले म्हणणं सरकार पर्यंत पोहोचवू शकतो. त्याला आपले मत मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. 

5  तक्रार आणि निवारण करण्याचा हक्क - 
उत्पादना विषयी असो,व्यवसायका विषयी असो, कंपनी विषयी असो ग्राहकाची फसगत झाली असेल तर या कायद्याच्या अंतर्गत ग्राहक आपली तक्रार करू शकतो आणि ग्राहक मंचाला किंवा ग्राहक निवारण केंद्राला त्याचे निराकरण करावे लागते. ही तक्रार मोठी असो किंवा लहान असो त्याचे निराकरण ग्राहक तक्रार केंद्राला करावे लागते.
 
6 ग्राहक हक्काच्या शिक्षणाचा हक्क -
ग्राहक शिक्षण हक्क मिळविण्यासाठी ग्राहकाला जागृत करण्यासाठी  सरकारद्वारा वेगवेगळे उपक्रम राबविले जाते. जसे की जागो ग्राहक जागो. तसेच बरेच शिबीर आणि कार्यशाळा घेतल्या जातात. जेणे करून ग्राहकांना त्याच्या हक्काची माहिती मिळावी आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा. जेणे करून ग्राहकांची कोणत्याही प्रकारे फसगत होऊ नये. 
 
ग्राहकांचे फक्त हक्क नसून काही कर्तव्ये देखील आहे जसे की नेहमी उच्च गुणवत्तेचे उत्पादन घ्यावे ज्यांचा वर ISI एगमार्क असतात. जे आपल्याला सुरक्षतेची हमी देतात. त्या व्यतिरिक्त ग्राहकांनी फसवणूक झाल्यावर त्याची तक्रार निवारण केंद्रात द्यावी. तसेच फसवणूक होत आहे समजल्यास त्याचा विरोध करावा आणि त्याच्या विरोधात तक्रार करावी.
 
ग्राहकांसाठी मदत - 
ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या या हक्काचे संरक्षण होण्यासाठी भारत सरकार कडून हेल्पलाइन देखील आहे. ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या परिस्थिती मध्ये ग्राहक राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनच्या 1800114000 या टोल फ्री क्रमांकावर आपल्या तक्रारी करू शकतात. ह्या क्रमांकावर आपल्या सर्वं तक्रारींचे निवारण केले जाते जसे की विकत घेतलेल्या वस्तू मध्ये बिगाड झाल्यावर किंवा ग्राहकांच्या सेवे मध्ये त्रुटी असल्यास हेल्पलाइन कडून योग्य मार्गदर्शन मिळते. तसेच ग्राहक www.nationalconsumerhelpline.in या संकेत स्थळावर जाऊन देखील आपली तक्रार नोंदवू शकतात. 
 
ग्राहक म्हणून हे लक्षात ठेवा -
1 कोणत्याही हॉटेलमध्ये मोफत पाणी पिऊ शकता. तसेच स्वच्छतागृहाचा वापर करू शकता.
2 सुटे पैसे नाही म्हणून दुकानदार गोळ्या चॉकलेट देऊ शकत नाही.
3 दिलेले वचन न पाळल्यास कंपनीच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते.
4 शैक्षणिक संस्थेची गुणवत्ता चांगली नसल्यास त्यांच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते.
5 रुग्णालयात देखील हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते. 
6 चित्रपट गृहांमध्ये खाद्य पदार्थ नेण्यास बंदी नाही.