मुंग्यांच्या युद्धात मोर्चा सांभाळतात म्हातारे सैनिक
जेव्हा मुंग्या युद्धासाठी जातात तेव्हा मोर्च्यात सर्वात पुढे म्हातारे सैनिक असतात. सैनिक जी आधीपासूनच मृत्यूला दाराशी उभे असतात. एका आठवड्याच्या रिसर्च दरम्यान हे परिणाम समोर आले आहेत.
जीवन आणि मृत्यूच्या झुंजीत किंवा घुसखोर त्यांच्या घरावर हल्लाबोल करत असतील किंवा आहार हिसकवण्याचा प्रयत्न होत असेल तर मुंग्यांचा एक झुंड एक विशेष सैन्य रणनीती अंतर्गत पाऊल उचलतात आणि ही रणनीती युद्धनीतीचा अगदी विपरित असते. रॉयल सोसायटी जर्नल बायोलॉजीच्या रिसचर्सने आपल्या रिपोर्टमध्ये ही बाब सांगितली आहे.
जपानच्या शोधकर्त्यांच्या टीमने रिपोर्टमध्ये म्हटले की प्रयोगशाळेत प्रयोग दरम्यान युवा रंगरूट यांच्या तुलनेत म्हातारे सैनिक मोर्च्यावर अधिक वेळा पुढे सरकले आणि बांबीचे दार दुश्मनांसाठी बंद करण्याचे प्रयत्न केले.
अध्ययनाप्रमाणे सैनिकांना त्यांच्या वयाप्रमाणे काम वाटप करण्यात येतं जसे सर्वाधिक वयाच्या सैनिकांना धोकादायक कामांसाठी पाठवलं जातं. मजेदार बाब म्हणजे म्हातार्या सैनिकांच्या तुलनेत म्हातार्या मादा मुंग्यांना अधिक मोर्च्याचा पहिल्या पंक्तीमध्ये जागा देण्यात आली ज्याने ते हल्ला सहन करत दुसर्यांची रक्षा करू शकतात. युवा सैनिक बांबीच्या दाराऐवजी केंद्रीय सुरक्षेसाठी तैनात होते. याने युवा सैनिक सुरक्षित राहतात आणि या प्रकारे त्यांना स्वत: आणि स्वत:चे जीवन काळ वाढवण्यास मदत मिळते.
अधिकश्या मुंग्यांमध्ये मादा आणि नर दोघेही वांझ असतात. यांचे मोठे जबडे यांचा हत्यार असून यांचे अनेक समूह असतात जसे की नवजातांची काळजी घेणारे, बांबी निर्माण करणारे आणि प्रजनन करणार्या राजा आणि राणी यांचे समूह. असेच नाही तर म्हतार्या सैनिकांना त्याच्या अनुभव किंवा क्षमतेच्या आधारावर मोर्च्यावर पाठवण्यात येतं. ते सुरक्षा तंत्रात योगदान करू शकले नाही तर त्यांना मोर्च्याच्या पुढल्या पंक्तीत राहायचे असतं, बहुतेक स्वत: प्राण गमावून दुसर्यांना जिवंत ठेवण्यासाठी, हीच समूहाची प्रथा आहे.