जागतिक अन्न सुरक्षा दिन 2021 :अन्न, वस्त्र अन निवारा, या प्रमुख गरजा मानवाच्या
अन्न, वस्त्र अन निवारा, या प्रमुख गरजा मानवाच्या,
प्राधान्य देऊन त्याला,त्या पूर्ण करण्याच्या!
सुदृढ शरीरा करीता सकस आहार घ्यावा निश्चित,
सुरक्षा त्या अन्नाची करणे हेच लक्ष केंद्रित,
किडा कीटका पासून त्यास सांभाळावे,
नासाडी होणार नाही याकडं लक्ष पुरवावे,
भुकेने न जावो कुणाचा ही बळी अकारण,
या प्रश्नाचं व्हावं योग्य निराकरण,
बांधावी गोदामे, साठवावे पुरेसे अन्न त्यात,
स्तर योग्य नेहमीच असावा,द्यावा भर यात,
सुरक्षित अन्न देईल उत्तम भविष्या ची पुष्टी,
सुरक्षीत भविष्य, असेल मानव जातीची संतुष्टी.
अश्विनी थत्ते