अन्नाची चव वाढविण्यासाठी या टिप्स अवलंबवा
स्वयंपाक करणे आणि त्याला चांगल्या पद्धतीने सादर करणे ही एक कलाच आहे. या साठी आपल्याला खूप परिश्रम करावे लागते. अन्न शिजवताना त्यामध्ये घातले जाणारे मसाले अन्नाची चव वाढवतात. काही डिश अशा असतात ज्यामध्ये मीठ आणि काळीमिरपूडचं घालून त्याची चव वाढते. काही अशा सोप्या टिप्स आहे ज्या अन्नाची चव वाढवतील. चला तर मग जाणून घेऊ या.
1 काळीमिरपूड वापरताना -
* काळी मिरपूड च्या ऐवजी काळीमिरपुडची भरड घाला.
* काळी मिरपूड आधी घाला नंतर मीठ घाला.
2 मिठाचा वापर करताना -
* मीठ अन्नाची चव वाढवते.अन्नात मीठ नसेल तर अन्नाला चवच येत नाही. मिठाचा वापर अन्नात नेहमी खाद्यपदार्थ पूर्ण शिजल्यावर शेवटून करा. या मुळे त्याची चव चांगली येते.
3 जुने मसाले वापरू नका-
मसाल्यांच्या पाकीट उघडल्यावर तीन महिन्यातच मसाले वापरून घ्या. कारण एकदा पाकीट उघडल्यावर त्याचा वास कमी होतो.या मुळे अन्नाला चव येत नाही.
4 मसाले नेहमी वरून घाला-
आपण बघितले असेल की आचारी लोक मसाल्याचा वापर नेहमी वरून करतात या मुळे जिन्नस ला वेगळी चव येते आणि मसाले चांगल्या प्रकारे जिन्नसांत मिसळतात.
स्वयंपाक करताना या टिप्स लक्षात ठेवा आणि अन्नाची चव वाढवा.