1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (23:22 IST)

Vastu Tips: या उपायांनी घरातील वास्तूच्या त्रासांपासून मुक्ती मिळेल

qप्रत्येक दिशा आणि प्रत्येक गोष्टीचे महत्त्व वास्तुशास्त्रात सांगितले आहे. वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक गोष्टीत ऊर्जा असते, ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जेसाठी नियम दिले आहेत. 
 
अनेकवेळा लोक वास्तूच्या माहितीशिवाय घर बांधून घेतात. वास्तुदोषामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे घरातील अडचणी, आर्थिक समस्या आणि कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही वास्तुदोषाचा सामना करावा लागत असेल तर या सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही घरातील कोणतीही तोडफोड न करता वास्तुदोष दूर करू शकता.
 
बाथरूम आणि किचनचा दरवाजा समोरासमोर असेल तर करा हे उपाय-
ज्या घरात किचन आणि बाथरूमचे दरवाजे समोरासमोर असतात ते सर्वात मोठा वास्तुदोष मानला जातो. वास्तुदोषामुळे कुटुंबात संकटांचा डोंगर कोसळू शकतो. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात स्वयंपाकघर आणि स्नानगृह समोरासमोर बांधलेले असतील तर दोन्हीच्या मध्ये जाड पडदा लावावा. तसेच बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा, गरज असेल तेव्हाच उघडावा.
 
मुख्य दरवाजाच्या वास्तू दोषावर उपाय- वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर वास्तुदोष असल्यास व्यक्तीला कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा व्यवसायात नुकसान होते. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजाच्या दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मुख्य दरवाजावर स्वस्तिक लावावे. यासोबतच श्री गणेशाची मूर्ती दारात लावावी. मुख्य प्रवेशद्वारावर कोणत्याही प्रकारची घाण होऊ देऊ नका.