बुधवार, 26 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मराठी दिन
Written By
Last Modified: बुधवार, 26 फेब्रुवारी 2025 (15:56 IST)

Marathi Bhasha Gaurav Din 2025 मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
माय मराठी, साद मराठी
भाषांचा भावार्थ मराठी,
बात मराठी, साथ मराठी
जगण्याला या अर्थ मराठी
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा
 
रुजवू मराठी भाषा
खुलवू मराठी भाषा
जगवू मराठी भाषा
चला बोलू फक्त मराठी
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
येणार्‍या प्रत्येक पिढीस अभिमान वाटेल
अशी सदैव राहो माझी मराठी भाषा
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
मराठी म्हणजे गोडवा, 
मराठी म्हणजे प्रेम,
मराठी म्हणजे संस्कार, 
मराठी म्हणजे आपुलकी,
मराठीला माय मानणाऱ्या सर्वांना
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ।
एवढ्या जगात माय मानतो मराठी।।
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
मराठी भाषा गौरव दिनानिमत्त्
करु मराठी भाषेचा सन्मान
राखू मराठीचा अभिमान
करु मराठीचा जयजयकार
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा
 
प्रत्येकाला आपली भाषा प्रिय असते 
हे जरी खरे असले 
तरीही मराठी भाषेचे कौतुक आणि 
त्यात असणारा गोडवा 
याची अभिमान काही वेगळाच आहे
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
माझ्या मराठी मातीचा 
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दर्‍याखोर्‍यातील शिळा
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा
आईचा असे माझ्या एक वेगळाच तालस्वर
प्रेमळ ती लडिवाळ भाषा मराठी सुंदर
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । 
एवढ्या जगात माय मानतो मराठी।। 
मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
आईची भाषा अर्थात मातृभाषा 
आणि मराठी ही आपला सर्वांचाच अभिमान आहे
मराठी राजभाषा दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा
 
मराठी भाषेतील माधुर्य अनुभवूया
मराठी भाषा गौरव दिन साजरा करुया
 
माय मराठी ! 
तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी
मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा