शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मराठी दिन
Written By
Last Modified: शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (08:23 IST)

मातृभाषा आमुची मराठी

पिढी दर पिढी गिरवली मराठी,
तीच आहे मातृभाषा आमुची मराठी,
विपुल साहीत्य सम्पदा आमुच्या साठी आहे,
मराठीची गंगा आमुच्या साठी वाहे,
दिलेत कित्ती साहित्यिक अन कवी आम्हास,
योग्य तो मान सन्मान वाटे सर्वास,
गर्व वाटतो असण्याचा मज मराठी,
तीच सर्वस्व आहे ,अभिमान अमुच्यासाठी,
वाढवावी शान अन मान भाषेचा,
बोला अगत्याने मराठी हा आग्रह अमुचा !!
वाचा आमची साहीत्य सम्पदा विपुल,
वाढवा ज्ञान, करा विकास तुम्ही सकल,
लावावी सवय वाचनाची लहानग्यांना,
स्फुरतील लेखन अजून, स्फुरण नवोदितांना !
अश्विनी थत्ते.