बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Updated :मुंबई , बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (13:01 IST)

पशुवैद्यकीय पदवीधरांची कत्तलखान्यांच्या कत्तलीच्या क्षमतेनुसार नेमणूक – मंत्री सुनील केदार

sunil kedar
नोंदणीकृत खाजगी पशुवैद्यकीय पदवीधरांची कत्तलखान्याच्या कत्तलीच्या क्षमतेनुसार नेमणूक करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
 
मंत्रालयात पशुवैद्यकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळेस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता यांच्यासह राज्यातील पशुवैद्यक अधिकारी उपस्थित होते.
 
मंत्री श्री.केदार म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या तत्सम प्राधिकरणाद्वारे प्राधिकृत असलेल्या राज्यातील अधिकृत कत्तलखान्यांमध्ये नोंदणीकृत असलेल्या खाजगी पशुवैद्यकांना संबंधित कत्तलखान्याकरिता प्राण्यांच्या कत्तली संदर्भात कत्तलपूर्व तपासणी करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्य आणि राज्याबाहेरील पशु कत्तलखान्यामध्ये कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. राज्यातील काही भागात निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येतात. मनुष्यबळ अपुरे असल्याने टॅगींग करिता अडचणी येतात या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे श्री.केदार यांनी यावेळी सांगितले. यासाठी पशुवैद्यकांची कत्तलखान्याच्या क्षमतेनुसार नेमणूक करण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
 
परराज्यातून आणि राज्यातून येणाऱ्या जनावरांचे टॅगींग होणे महत्त्वाचे असून कत्तली पूर्व टॅगींग करून घेण्याचे यावेळी संबंधितांना त्यांनी सांगितले. या व्यवसायातील आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.