1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified गुरूवार, 28 जानेवारी 2021 (12:06 IST)

BEL मध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी, पगार 35000, या प्रकारे करा अर्ज

Bharat Electronics Limited (BEL) मध्ये इंजीनियर पदांवर भरतसाठी अर्ज आमंत्रित केले गेले आहे. BEL ने एकूण 26 पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांवर अर्ज करण्यास इच्छुक BEL च्या अधिकृत वेबसाइट bel-india.in वर लॉग इन करु शकतात. या पदांवर अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी आहे. अर्ज केल्यानंतर या पोस्टद्वारे डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, आईई नाचाराम, हैदराबाद- 500076, तेलंगणा या पत्त्यावर पाठवायचे आहे.
 
उमेदवारंची निवड विद्यार्थ्यांद्वारे अकेडमिकमध्ये प्राप्त गुणांव्यतिरिक्त अनुभवावर अवलंबून असेल. उमेदवारांना अकेडमिकचे 75 अंक आणि 10 अंक अनुभवाच्या आधारावर देण्यात येतील. जेव्हाकी 15 अंक व्हिडिओ आधारित साक्षात्काराच्या आधारावर दिले जातील. अंतिम निवड झाल्यावर उमेदवारांना ईमेलद्वारे माहिती पुरवली जाईल. या पदांवर अर्ज करण्यासाठी मान्यता प्राप्त विश्वविद्यालयाहून इंजीनियरिंग पदवीधर असणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवाराला दोन वर्षाचा अनुभव असला पाहिजे.
 
अर्ज करण्यासाठी 500 रुपए फी भुगतान करावं लागेल. पीडब्ल्यूडी, एससी, एसटी श्रेणीच्या लोकांना अर्ज शुल्क नाही. निवडलेल्या उमेदवारांना दोन वर्षासाठी भरती केलं जाईल, ज्याला नंतर चार वर्षांसाठी वाढ‍वण्यात येईल. निवडलेल्या उमेदवाराला पहिल्या वर्षी 35000, दुसर्‍या वर्षी 40000, तिसर्‍या वर्षी 45000, आणि चवथ्या वर्षी 50000 रुपये पगार दिला जाईल. या व्यतिरिक्त दर वर्षी 10000 रुपए मेडिकल इंश्योरेंस प्रीमियम, अटायर अलाउंस, स्टिचिंग चार्ज, फुटवियर अलाउंस इतर मिळेल.