गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 25 मे 2022 (15:04 IST)

Indian Bank SO Recruitment 2022:इंडियन बँकेत पदवीधरांसाठी बंपर भरती

jobs
इंडियन बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी रिक्त पद काढले आहेत. नवीनतम अधिसूचनेनुसार,  इंडियन बँक SO भर्ती 2022 पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया  24 मे 2022 पासून सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट www.indianbank.in ला भेट द्यावी लागेल. 
 
उमेदवारांनी अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि अर्ज करण्यापूर्वी सूचना वाचा. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून अधिसूचना वाचू शकतात Indian-Bank-SO-Recruitment-2022-Notification-PDF . रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी (इंडियन बँक SO भर्ती 2022) उमेदवारांना https://ibpsonline.ibps.in/ibsoapr22/ वर क्लिक करावे लागेल आणि अर्ज करावा लागेल.
 
 रिक्त जागा तपशील
पदाचे नाव : स्पेशालिस्ट ऑफिसर (SO)
रिक्त पदांची संख्या : 312
 
वेतनमान -
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 36000 ते 76100 पर्यंत वेतन मिळेल.
 
अर्ज शुल्क 
सामान्य / OBC / EWS : 850
SC / ST / PwD : 175
पेमेंट मोड : ऑनलाइन
 
 महत्त्वाच्या तारखा-
अर्जाची प्रक्रिया सुरू होईल: 24 मे 2022 अर्ज करण्याची
शेवटची तारीख: 14 जून 2022
परीक्षा तारीख: सध्या जाहीर केलेली नाही
 
 पात्रता -
स्पेशालिस्ट ऑफिसरसाठी 312 रिक्त पदांसाठी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा बँकेत काम करण्याचा अनुभव असलेल्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून CA किंवा बी.टेक असावा. 
 
 वयोमर्यादा-
या पदांसाठी 20 ते 38 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांची वयोमर्यादा 1.1.2022 रोजी मोजली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल.