1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (08:53 IST)

Indian Navy Recruitment 2021: क्रीडा कोट्यात विविध पदांवर भरती

Indian Navy Recruitment 2021
क्रीडापटू असणार्‍यांसाठी देशसेवेसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. भारतीय नौदलात क्रीडा कोट्यात विविध पदांवर भरती होत असून जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असून ७ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करता येतील. 
 
नौदलातील खलाशी पदांवरील या भरतीसंदर्भातल्या अधिसूचना जाहीर केली गेली आहे त्यानुसार इच्छुक आणि योग्य उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र, ईशान्येतील राज्ये, जम्मू-काश्मीर, अंदमान-निकोबार, लक्षद्वीप येथे अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ मार्च २०२१ आहे.
 
पद आणि पात्रता
नेव्ही सेलर्स स्पोर्ट्स कोटा एन्ट्री (01/2021) बॅच अधिसूचनेनुसार डायरेक्ट इंट्री पेटी ऑफिसर (डीईपीओ)
सीनियर सेकेंडरी रिक्रूट (एसएसआर)
मॅट्रिक रिक्रूट (एमआर) कॅटेगरी मध्ये नौसैनिकांची भरती 
तीनही कॅटेगरी साठी पात्रता वेगवेगळी आहे.
 
सीनिअर सेकेंडरी रिक्रूट (MMR) - या पदांवरील भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य. वयोमर्यादा १७- २१ वर्षे.
 
मॅट्रिक रिक्रूट (MR) - या पदांसाठी उमेदवारांना दहावी उतीर्ण होणे अनिवार्य. वयोमर्यादा १७ - २१ वर्षे आहे.
 
विशेष- उमेदवारांना खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरील किंवा आंतरविद्यापीठ स्पर्धेत भाग घेतलेला असणे आवश्यक आहे. 
 
नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा. https://www.joinindiannavy.gov.in/files/event_attachments/Sailors_Sports_1_21_Advt.pdf