शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (09:27 IST)

Central Railway Recruitment 2021 : 10 वी आणि 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी

Central Railway Recruitment 2021 मध्य रेल्वेची महाराष्ट्रात मोठी भरती, दहावी उत्तीर्णांना संधी रेल्वेने अॅप्रेंटिस पदासाठी ही भरती आयोजित केली आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत 5 मार्च 2021 आहे. मध्ये रेल्वेच्या पाच ठिकाणी एकूण 2532 जागा भरण्यात येणार आहेत. तसेच परळच्या वर्कशॉप आणि कल्याण डिझेल शेड आणि मनमाड वर्कशॉपमध्ये विविध जागांवर भरती करण्यात येणार आहे.
 
मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूरमध्ये अडीच हजार जागांवर भरती निघाली आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 
पदांची तपशील
मुंबई 
कॅरेज अँड वॅगन वाडी बंदर- 288
मुंबई कल्याण डिझेल शेड- 53
कुर्ला डिझेल शेड- 60
एसआर डीईई कल्याण- 179
एसआर डीईई कुर्ला- 192
परळ वर्कशॉप- 418
माटुंगा वर्कशॉप- 547
एस अँन्ड टी वर्कशॉप, भायखळा- 60
 
भुसावळ
कॅरेज अँड वॅगन डेपो- 122
इलेक्ट्रिक लोको शेड- 80
इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह कार्यशाळा- 118
मनमाड कार्यशाळा- 51
टीएमडब्ल्यू नाशिक रोड- 49

पुणे 
कॅरेज अँड वॅगन डेपो- 31 
डिझेल लोको शेड- 121
 
नागपूर
इलेक्ट्रिक लोको शेड- 48
अजनी कॅरेज व वॅगन डेपो- 66
 
सोलापूर
कॅरेज अँड वॅगन डेपो- 58
कुर्डुवाडी कार्यशाळा- 21
 
शैक्षणिक योग्यता 
या पदांसाठी दहावी पास किंवा 12 वी पास. कमीतकमी 50 टक्के गुण. व्होकेशनल, आयटीआय किंवा समकक्ष कोर्स केल्याचे प्रमाणपत्र.
 
वयमर्यादा 
15 ते 24 वर्षे.

फी
100 रुपये
 
निवड
मेरिट लिस्टद्वारे
 
नोटिससाठी येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.