1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified शुक्रवार, 11 डिसेंबर 2020 (10:16 IST)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयात 12 वी उत्तीर्ण आणि पदव्युत्तर पदवीसाठी भरती

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नॅशनल बायॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायॉलॉजिकल) ने 12 वी उत्तीर्ण आणि पदव्युत्तर झालेल्या तरुणांसाठी 11 रिक्तपदे जाहीर केलेल्या आहेत. ही भरती सहाय्यक किंवा असिस्टंट आणि ज्युनिअर हिंदी ट्रान्स्लेटर पदासाठी काढण्यात आली आहे. अर्जदारांना ऑफलाईन अर्ज करावे लागणार. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 फेब्रुवारी 2021 आहे. अर्ज करण्यासाठीचे फॉर्म किंवा पत्रक nib.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन डाउनलोड करू शकता.
 
पद आणि पात्रता - 
असिस्टंट किंवा सहाय्यक - एकूण 5 पदे 
कमाल वय मर्यादा - 30 वर्षे 
शैक्षणिक पात्रता - विज्ञान विषयात किमान 60 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण. 30 शब्द प्रति मिनिटाच्या वेगाने हिंदीमध्ये टाईप करणे किंवा 35 शब्द प्रति मिनिटाच्या वेगाने इंग्रेजीमध्ये टाईप करणे.  
 
असिस्टंट किंवा सहाय्यक - एकूण पदे 5
कमाल वय मर्यादा - 27 वर्षे 
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही प्रवाहात कमीत कमी 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण 30 शब्द प्रति मिनिटच्या वेगाने हिंदी मध्ये टाईप करणे किंवा 35 शब्द प्रति मिनिटाच्या वेगाने इंग्रजी मध्ये टाईप करणे.
 
ज्युनिअर हिंदी ट्रान्स्लेटर - एकूण 1 पद 
कमाल वय मर्यादा - 30 वर्ष 
शैक्षणिक पात्रतेसाठी अधिसूचना बघा.
 
आपले अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांच्या सत्यापित प्रतींसह या पत्त्यावर पाठवा.
डायरेक्टर, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल्स (स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय) ए-32, सेक्टर 62, नोएडा इंस्टीट्यूशनल एरिया (यूपी), - 201309