1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Updated : मंगळवार, 18 जुलै 2023 (13:13 IST)

Maharashtra Municipal Council Recruitment 2023 : महाराष्ट्र नगर परिषदेत 1782 जागांवर मेगा भरती सुरु, त्वरा अर्ज करा

jobs
महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023:  राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद राज्य सेवा गट क मध्ये श्रेणी अ, ब आणि क मध्ये 1782 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे. 
 
पदांचा तपशील -

पदाचे नाव- 
स्थापत्य अभियंता, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, लेखापाल/ लेखापरीक्षक , कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, अग्निशमन अधिकारी, स्वच्छता निरीक्षक. वरील सर्व पदे गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) अंतर्गत आहे. 
 
पदसंख्या -
एकूण पदसंख्या - 1782 
 
पात्रता-
विद्युत अभियंता- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + MS-CIT किंवा समतुल्य असावा .
संगणक अभियंता – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + MS-CIT किंवा समतुल्य.
पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता – मेकॅनिकल/ पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा + MS-CIT किंवा समतुल्य असावा .
स्थापत्य अभियंता – सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + MS-CIT किंवा समतुल्य असावा .
स्वच्छता निरीक्षक – कोणत्याही शाखेतील पदवी + स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा.
लेखापरीक्षक/ लेखापाल – B.Com + MS-CIT किंवा समतुल्य असावा .
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT किंवा समतुल्य असावा .
अग्निशमन अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदवी + अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम
नागपूरमधून उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण + MS-CIT किंवा समतुल्य.असावा .
 
उमेदवारांनी अधिकृत संकेत स्थळावर भेट द्यावी. 

अर्ज कसा करावा-
उमेदवारांना या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे. 
 
अर्ज फी- 
सामान्य वर्गासाठी - 1000 रुपये
मागासवर्गीय/अनाथ/EWS वर्गासाठी -900 रुपये 
 
महत्त्वाच्या तारखा- 
अर्ज करण्याची तारीख- 13 जुलै 2023 
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 ऑगस्ट 2023 
 
वयो मर्यादा-
सामान्यवर्गच्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे असावे. 
मागासवर्गीय /अनाथ/EWS वर्गाच्या उमेदवारांच्या वयोगटात 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. 
 




Edited by - Priya Dixit