शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (13:13 IST)

नाबार्डमध्ये पदवीधरांना नोकरीची संधी

NABARD Recruitment
NABARD Recruitment 2023: नाबार्डमध्ये असिस्टंट मॅनेजर पदाच्या तब्बल 150 जागांसाठी भरती केली जात आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज 23 सप्टेंबर 2023 पर्यंत करता येणार आहे.
 
NABARD Recruitment For Assistant Manager राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याबाबद माहिती जाणून घ्या-
 
पद
जनरल : 77  जागा
कम्प्युटर / आयटी : 40 जागा
फायनान्स : 15 जागा
कंपनी सेक्रेटरी : 03 जागा
सिव्हिल इंजिनीअर : 03 जागा
इलेक्ट्रिकल इंजिनीअर : 03 जागा
जियो इन्फोर्मेशन : 02 जागा
फोरेस्टरी : 02 जागा
फूड प्रॉसेसिंग : 02 जागा
स्टॅटेस्टिक : 02 जागा
मास कम्युनिकेशन/ मीडिया स्पेशलिस्ट : 01 जागा
 
शैक्षणिक पात्रता :
जनरल : 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, तर राखीव प्रवर्गातील उमेदवार 55 टक्के गुणांसह पदवीधर किंवा MBA/ PGDM किंवा CA/ CS/ ICWA किंवा Ph.D.
 
कॉम्प्युटर/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी : 60 टक्के गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजि कॉम्प्युटर अँप्लिकेशन/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात पदवी किंवा 55 टक्के गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.
 
फायनान्स : 60 टक्के गुणांसह फायनान्स/ बँकिंग विषयात BBA/ BMA किंवा 55 टक्के गुणांसह मॅनेजमेंट (फायनान्स) विषयात PG डिप्लोमा किंवा फायनान्स विषयात MBA/ MMS किंवा 60 टक्के गुणांसह फायनांसीअल आणि इन्व्हेस्टमेंट अनालिसिस विषयात पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + CA/ CFA/ ICWA.
 
कंपनी सेक्रेटरी : कोणत्याही शाखेतील पदवी + CS.
 
सिव्हिल इंजिनीअरिंग : 60 टक्के गुणांसह सिव्हिल विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा संबंधित विषयात 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.
 
इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग : 60 टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा संबंधित विषयात 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.
 
जिओ इन्फॉर्मेटिक : 60 टक्के गुणांसह जिओ इन्फॉर्मेटिक विषयात पदवी किंवा संबंधित विषयात 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.
 
फॉरेस्ट्री : 60 टक्के गुणांसह फॉरेस्ट्री विषयात पदवी किंवा संबंधित विषयात 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.
 
फूड प्रोसेसिंग : 60 टक्के गुणांसह फूड प्रोसेसिंग/ फूड टेक्नॉलॉजि विषयात पदवी किंवा संबंधित विषयात 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.
 
स्टॅटेस्टिक : 60 टक्के गुणांसह स्टॅटेस्टिक विषयात पदवी किंवा संबंधित विषयात 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.
 
मास कम्युनिकेशन/ मीडिया स्पेशलिस्ट : 60 टक्के गुणांसह मास मीडिया/ कम्म्युनिकेशन/ जनरलीजम/ अड्वर्टायजिंग आणि पब्लिक रिलेशन विषयात पदवी किंवा संबंधित विषयात 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + संबंधित विषयात डिप्लोमा.
 
वयोमर्यादा :
खुला प्रवर्ग : 21 ते 30 वर्षे.
ओबीसी : 3 वर्षांची सूट.
मागासवर्गीय : 5 वर्षांची सूट.
 
अर्ज शुल्क :
खुला/ ओबीसी/ EWS : 800 रुपये
मागासवर्गीय/ PwBD : 150 रुपये
 
महत्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरवात : 2 सप्टेंबर 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 सप्टेंबर 2023
 
या प्रकारे करा अर्ज :
NABARD मधील जागांसाठी अर्ज करण्यास पात्र उमेदवारांना नाबार्डच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज करावे.
 
NABARD अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.