मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Updated : बुधवार, 2 मार्च 2022 (20:53 IST)

NTPC Recruitment 2022: वैद्यकीय अधिकारी पदांसाठी भरती, 16 मार्चपूर्वी अर्ज करा

NTPC Recruitment 2022: Recruitment for Medical Officer Posts
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC लिमिटेड) ने GDMO, वैद्यकीय विशेषज्ञ आणि इतरांसह 97 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार NTPC भर्ती 2022 साठी 16 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार careers.ntpc.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात, अर्ज करण्यापूर्वी, खाली दिलेली माहिती वाचावी.
 
भरती अधिसूचना पाहण्यासाठी या https://careers.ntpc.co.in संकेत स्थळांवर क्लिक करा
 
 
अर्जाची तारीख
या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, उमेदवार 16 मार्च 2022 पूर्वी अर्ज करू शकतात, त्यानंतर कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 
पदांचा तपशील-
 
GDMO-60 पदे
बालरोगतज्ज्ञ-9 पदे
ऑर्थोपेडिक-5 पदे
नेत्ररोगतज्ज्ञ-2 पदे
रेडिओलॉजिस्ट-5 पदे
ओ अँड जी -3 पदे
पॅथॉलॉजिस्ट-5 पदे
इएनटी -2 पदे
 
 शैक्षणिक पात्रता
 
GDMO- उमेदवाराने MBBS पदवी केलेली असावी.
 
बालरोगतज्ञ- बालरोगात एमडी/डीएनबीसह एमबीबीएस किंवा बाल आरोग्यामध्ये पीजी डिप्लोमा.
 
ऑर्थोपेडिक - MS/DNB किंवा MBBS सह PG डिप्लोमा इन ऑर्थोपेडिक्स
 
नेत्ररोगतज्ञ- MS/DNB किंवा MBBS सह नेत्रविज्ञान मध्ये PG डिप्लोमा
 
रेडिओलॉजिस्ट- MD/DNB किंवा MBBS सह PG डिप्लोमा इन रेडिओलॉजी.
 
O&G- MD/DNB किंवा MBBS सह O&G मध्ये PG डिप्लोमा.
 
पॅथॉलॉजिस्ट- MD/DNB किंवा MBBS सह PG डिप्लोमा इन पॅथॉलॉजी.
 
ENT- MD/MS/DNB किंवा ENT मध्ये PG डिप्लोमा सह MBBS.
 
अर्ज कसा करायचा
इच्छुक आणि पात्र उमेदवार NTPC भर्ती 2022 साठी अधिकृत वेबसाइटवरून 16 मार्च 2022 किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.