शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By

Mission Recruitment आतापर्यंत 4 लाख सरकारी नोकऱ्या, जाणून घ्या कोणत्या विभागात किती नोकऱ्या

narendra modi
* केंद्र सरकारच्या 'मिशन रिक्रूटमेंट' अंतर्गत आतापर्यंत 4 लाख लोकांना नोकर्‍या
प्रत्येक 6 पैकी 1 महिला उमेदवार
मोदी सरकारने 'मिशन रिक्रूटमेंट' ची गती वाढवली
 
Mission Recruitment : केंद्र सरकारने आपले 'मिशन रिक्रूटमेंट' अधिक तीव्र केले आहे. या अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येत आहे. केंद्र सरकारने या वर्षाच्या अखेरीस 10 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. सरकारी नोकऱ्या देतानाही महिलांची काळजी घेण्यात आली आहे.
 
सरकारी आकडेवारीनुसार, 2023 च्या अखेरीस 10 लाख पदे भरण्यासाठी सरकारच्या सामूहिक भरती अभियान 'मिशन रिक्रूटमेंट' अंतर्गत आतापर्यंत नियुक्त केलेल्या प्रत्येक सहा उमेदवारांपैकी एक महिला होती. यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत सहा रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. या दरम्यान किमान 4,30,546 उमेदवारांना लिपिक आणि टंकलेखक, शिक्षक आणि डॉक्टरांच्या सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.
 
‘इंडियन एक्सप्रेस’ च्या एका रिपोर्टप्रमाणे कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे केंद्र सरकारच्या नोकऱ्या मिळालेल्यांमध्ये 3,61,763 (84 टक्के) पुरुष आणि 68,783 (16 टक्के) महिला आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 महिन्यांत 10 लाख रिक्त पदे भरण्याचे निर्देश दिले होते. यानंतर शासनाच्या अनेक विभागांमध्ये मेगा भरती मोहीम सुरू झाली. पीएम मोदींच्या या घोषणेनंतर काही महिन्यांनी 14 ऑक्टोबरला पहिला रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
 
केंद्र सरकारच्या बहुतांश भरतीसाठी रेल्वे मंत्रालय (1,38,986 भरती ) साठी केले गेले आहेत, त्यानंतर पोस्ट विभाग (68,225) आणि गृह मंत्रालय (43,592) येथे भरती केल्या गेल्या आहेत. यासह वित्तीय सेवा विभागासाठी 33,743 उमेदवारांची निवड करण्यात आली. संरक्षण मंत्रालयात 18,635, महसूल विभागात 14,952 आणि उच्च शिक्षण विभागात 11,536 नवीन भरती झाल्या. कार्मिक मंत्रालयाने सांगितले की मोठ्या प्रमाणात भरती ग्रुप बी आणि ग्रुप सी स्तरावरील पदांवर होते. जे या विभागांना अत्याधुनिक स्तरावर नागरिकांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी थेट मदत करते.