रेल्वेत बंपर भरती; 90 हजार पदे भरणार
रेल्वेत बंपर भरती होणार आहे. 90 हजार पदांसाठी ही भरती होत आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेत नोकरभरती झाली नाही. त्यात वर्षाला 40 ते 45 हजार कर्मचारी सेवानिवृत्त होतात. अशात रेल्वेच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करता येणार नाही. त्यामुळे आता नोकरभरतीवर सरकारला दरवर्षी अतिरिक्त 4 हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत, असेही अधिकार्याने सांगितले. रेल्वेने 'ड' श्रेणीतील गँगमन, ट्रॅमॅकन आणि इतर 63 हजार पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. याशिवाय लोको पायलट्स, असिस्टंट लोको पायलट्स आदी 26,500 पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे.