Railway Recruitment 2022: रेल्वेमध्ये 12वी आणि पदवीधरांसाठी बंपर रिक्त जागा, पगार 35,400 पर्यंत
सरकारी नोकरी 2022: रेल्वे भर्ती सेल, पश्चिम मध्य रेल्वे (WCR) ने विविध NTPC (नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. स्टेशन मास्टर, स्टेशन कमर्शियल कम तिकीट आणि सीनियर क्लर्क कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट आणि कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट या पदांसाठी रेल्वे भरती सुरु आहे. ही भरती GDCE कोट्याअंतर्गत केली जाईल. या भरतीसाठी 28 जुलै 2022 पर्यंत नियमित आणि पात्र कर्मचारी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
रिक्त पदांचा तपशील
स्टेशन मास्टर - 8 पदे
सिनिअर कमर्शिअल कम तिकीट लिपिक - 38 पदे
सिनिअर क्लर्क कमी टायपिस्ट - 9 पदे
कमर्शिअल कम तिकीट लिपिक - 30 पदे
अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट - 8 पदे
ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट -28 पदे
एकूण पदे-121
पात्रता-
उमेदवार पदवीधर असणे अनिवार्य आहे. 12वी उत्तीर्ण उमेदवार कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदांसाठी अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा-
सामान्य वर्गासाठी- उमेदवारांचे वय18ते 42 वर्षांच्या दरम्यान असावे.
OBC - OBC साठी वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे आहे.
SC/ST - SC/ST साठी 18 ते 47 वर्षे आहे.
पगार -
स्टेशन मास्टर - 35400
सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क - 29200
सीनियर क्लर्क कम टायपिस्ट - 29200
कमर्शियल कम तिकीट क्लर्क - 21700
अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट - 19900
ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट 19900
अर्ज कसा करावा-
* भर्ती वेबसाइटवर GDCE अधिसूचना क्रमांक 01/2022 च्या लिंकवर क्लिक करा
* त्यानंतर New Registrationच्या लिंकवर क्लिक करा.
* आता मागितलेली सर्व माहिती सबमिट करून नोंदणी करा.
* फोटो अपलोड करा आणि स्वाक्षरी करा.
* अर्ज फी भरा.
*सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.