मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 16 डिसेंबर 2020 (09:47 IST)

RRC Apprentice Recruitment 2020: रेल्वे भरती सेल ने 1004 पदांसाठी अर्ज मागविले

RRC Apprentice Recruitment 2020: रेलवे रिक्रुटमेंट सेल ने(RRC)ने अप्रेंटिसशिपसाठी 1004 रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. ही भरती दक्षिण पश्चिम/साऊथ वेस्टर्न रेल्वेच्या विविध विभाग/कार्यशाळा/युनिट्स साठी आहे. RRC च्या या भरती मध्ये अर्ज करू इच्छुक उमेदवार विविध ट्रेड्स साठी आरआरसी ची वेबसाइट्स rrchubli.in वर देखील ऑनलाईन अर्ज करू शकतात. लक्षात असू द्या की हे अर्ज 9 जानेवारी 2021 च्या पूर्वी सादर करावयाचे आहे. 
 
आरआरसी अप्रेन्टिस भरतीतील एकूण रिक्त 1004 जागांपैकी 287 रिक्त जागा हुबळी डिव्हिजन साठी, 280 रिक्त जागा बंगळूर डिव्हिजन साठी, 217 कॅरीज रिपेयर वर्कशॉप हुबळी, 177 रिक्त जागा मैसूर डिव्हिजन साठी आणि 43 रिक्त जागा सेंट्रल वर्कशॉप म्हसूर साठी आहे.
 
अर्ज फी -
सामान्य वर्गासाठी आणि ओबीसी साठी - 100 रुपये अर्ज फी शुल्क म्हणून द्यावे लागतील, तर अनुसूचित जाती आणि जमाती आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
 
आरआरसी भरतीसाठी सामान्य प्रवर्गाच्या उमेदवारांचे वय वर्ष 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे.
अर्ज प्रक्रिया आणि इतर अटींसाठी आरआरसी अप्रेंटिसच्या भरतीची अधिसूचना बघण्यासाठी येथे https://www.rrchubli.in/SWR%20-%20Act%20Apprentice%20Notification-2020%20(Final)_compressed.pdf क्लिक करा.