शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (16:29 IST)

महाराष्ट्र मेट्रो रेल पदांवर अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढविण्यात आली

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या १३९ जागांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र आता ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता आले नाही, त्यांच्यासाठी महा मेट्रोने आणखी एक संधी दिली आहे. या पदांवर अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढविण्यात आली आहे.
 
आता तुम्ही ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकता. यापूर्वी या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी होती. दरम्यान १३९ जागांवर ८६ सुपरवायजर पदांसाठी आणि ५३ नॉन सुपरवायजर पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत अर्ज केले नाहीत, त्या उमेदवारांनी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करावेत.
 
भरतीसंदर्भात तपशीलवार माहिती महामेट्रोच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवार mahametro.org या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून भरतीची सविस्तर माहिती मिळवू शकतात. भरतीसाठी उमेदवार अभियांत्रिकी, पदविका, आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सुपरवायजर पदांसाठी किमान वय १८ वर्षे आणि जास्तीत जास्त वय २८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. त्याचबरोबर नॉन सुपरवायजर पदांसाठी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. आरक्षणाच्या आधारे वेगवेगळ्या श्रेणीतील उमेदवारांना वयात सूट देण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना दोन वर्ष प्रोबेशन पीरियडवर ठेवले जाईल. ऑनलाईन परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल. या ऑनलाइन परीक्षा पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी घेण्यात येतील.