मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : गुरूवार, 28 जानेवारी 2021 (09:49 IST)

Paush Purnima 2021 पौष पौर्णिमा शुभ योग, मुहूर्त, व्रत विधी आणि महत्व

पौष महिन्याच्या पौर्णिमेला गंगा स्नान, व्रत आणि दान-पुण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करुन दान, तप केल्याने पुण्याची प्राप्ती होते आणि मोक्ष प्राप्ती होते.
 
मुहूर्त
पौर्णिमा तिथी 28 जानेवारी 2021 गुरुवारी 01:18 पासून सुरू होऊन 29 जानेवारी 2021 शुक्रवारी रात्री 12:47 वाजेपर्यंत राहील.
 
यंदा खास योग
पौष पौर्णिमेला खास संयोग बनत आहे. या दिवशी गुरु पुष्य योग बनत आहे ज्यामुळे या तिथीचं महत्त्व अधिकच वाढतं. या दिवशी हा योग सूर्योदयापासून ते मध्यरात्रीपर्यंत विद्यमान असेल. विवाह वगळता कोणतेही इतर कार्य या‍ दिवशी आरंभ करणे शुभ ठरेल. सोबतच या दिवशी सर्वाथ सिद्धि योग आणि प्रीती योग देखील आहे.
 
कल्वास सुर होणार
पौष पोर्णिमेपासून कल्पवास सुरु होणार जे की माघ पौर्णिमेपर्यंत राहील. या काळात जीवन मृत्यूच्या चक्रापासून मुक्तीची कामना केली जाते.
 
व्रत विधी
पौष पौर्णिमेला स्नान करुन व्रत संकल्प घ्यावा.
पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यापूर्वी वरुण देवताचे स्मरण करावे.
सूर्याला अर्घ्य द्यावे.
भगवान मधुसूदनाची पूजा करावी.
त्यांना नैवेद्य अर्पित करावे.
दान दक्षिणा द्यावी.
 
पौर्णिमेला या वस्तू करा दान
तीळ, गूळ, ब्लेंकेट आणि गरम कपडे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. दान गरजू लोकांना करावे.

या दिवशी शाकंभरी नवरात्र समाप्ती असून देवीची पूजा आणि कथा करण्याची देखील पद्धत आहे.