1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified बुधवार, 27 जानेवारी 2021 (12:50 IST)

गुरूपुष्यामृत योगाचे महत्त्व

ज्योतिष शास्त्रात ग्रह, नक्षत्र, वार, करण, तिथी, मास आदी महत्त्वपूर्ण घटक असतात. त्यांचा प्रभाव आणि युती यांच्यामुळे शुभ व अशुभ काळ निर्माण होतो. यांच्याच सहाय्याने मानवाला इच्छित कार्यात यश मिळू शकते. 
 
गुरूवारी पुष्य नक्षत्राचा दिवस आल्यास तो अत्यंत शुभ मानला जातो. हा दिवस व नक्षत्र यांच्या संयोगातून गुरूपुष्यामृत योग निर्माण होतो. कोणत्याही कार्यात ९९.५ टक्के यश मिळविण्यासाठी त्याची सुरवात या दिवशी केली जाते. 28 जानेवारी 2021 रोजी गुरूपुष्यामृत योग आहे. 
 
'गुरू' ग्रह ज्ञान व यशस्वितेचा प्रतीक आहे. म्हणूनच या योगाच्या काळात उच्च शिक्षण, तंत्रज्ञान शिक्षण, कला, साहित्य, नाट्य, वाद्य वा कोणत्याही विषयातील संशोधनाचा प्रारंभ, शैक्षणिक वा अध्यात्मिक गुरू निवडणे, तंत्र, मंत्र व दीक्षा घेणे, परदेश यात्रा, व्यापार, धार्मिक कार्याचा प्रारंभ आदी कार्ये करणे शुभ मानले जाते. 
 
या मुहूर्ताचा सुक्ष्म अभ्यास केल्या या दिवशी साधणार्‍या योगात चंद्रबल, तारा बल, गुरू-शुक्रादी ग्रहांचा उदय-अस्त, ग्रहणकाल, पितृपक्ष व अधिक मास आदी बाबींचाही विचार केला जातो. म्हणूनच या योगात घराचे बांधकाम काढताना किंवा गृहप्रवेश करताना वा विवाह ठरवताना या सगळ्या बाबींचाही विचार करणे गरजेचे आहे. 
 
28 जानेवारी 2021 रोजी सर्वार्थ सिद्धी योग आहे. सकाळी 7.16 मिनिटाने सुरू होऊन उ. रात्री 3.50 वाजता तो संपेल.
 
काही लोक या वेळी कल्याण हेतूने व गुरूकृपा प्राप्त करण्यासाठी धार्मिक यात्रा करून तेथे खाद्यपदार्थ व वस्त्रांचे दान करतात. काही जण धार्मिक अनुष्ठाने करून, ब्राह्मणभोजन घालूनही पुण्य मिळवतात. 
 
नशीब बदलणारा, दारिद्र्य दूर करणारा आणि इच्छित फळ देणारा असा हा गुरूपुष्यामृत योग आहे.