बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Updated : गुरूवार, 8 एप्रिल 2021 (11:57 IST)

Street shopping करत असाल तर या प्रकारे स्वत:ला कॅरी करा आणि स्टाइलिश दिसा

ब्रांडेड कपडे खरेदी करणारे देखील अनेकदा स्ट्रीट साइड विकल्या जाणार्‍या वस्तूंकडे सहसा आकर्षित होतात. कारण या बाजारांमध्ये मोलभाव करत वस्तूं घेण्याची मजा काही वेगळीच असते. या जागांवरुन खरेदी केलेले कपडे स्वस्त असतात पण आपण त्या स्टाइलिश लुक कशा प्रकारे देऊ शकतात जाणून घ्या-
 
रोड साइडला विकले जाणार्‍या कपड्यांवर धूळ असते. अशात कपडे खरेदी केल्यावर त्यांना वॉश करुनच वापरावे. धुण्यासाठी अॅटीसेप्टिक लिक्विड वापरावं.
 
धुतल्यानंतर या कपड्यावर प्रेस केल्याने नवीन चमक येते. पॉलिश्ड कपडे असल्यामुळे त्यातील सुंदरता उठून दिसते.
 
असे कपडे योग्य रीत्या ठेवण्यात येत नसल्यामुळे अनेकदा याची शिलाई निघालेली असते किंवा दोरे निघत असतात अशात यावर दुसर्‍यांदा शिलाई करवणे योग्य ठरतं.
 
अनेकदा यात वापरण्यात येत असलेल्या कापडाची क्वालिटी तेवढी चांगली नसते कारण हे ब्रांडची कॉपी किंवा डुप्लीकेट असतात. म्हणून डिझाइन किंवा ट्रेंड न बघता फॅब्रिक बघून खरेदी करा. फॅब्रिक चांगलं नसेल तर ते वेगळंच चीप दिसून येतं.
 
स्ट्रीट साइड शॉप्सवर मिळणारे कपडे अनेकदा एक्सपोर्ट सरप्लस किंवा रिजेक्टेड पीसेस असतात त्यामुळे यात लागलेले बटण, जिप खराब असू शकतात. अशात आपण जरा खर्च करुन बटण किंवा जिप बदलवून घेतल्यास स्टाइल मेंटेन राहील.
 
ट्रायल रुम नसल्यामुळे साइजपेक्षा अधिक मोठे कपडे खरेदी करण्यात येतात अशात ऑल्टर करवून कपडे वापरता येतील.
 
स्टाइलिंग महत्त्वाचं आहे. अशा कपड्यांसोबत आवश्यक अॅक्सेसरीज, फुटवेयर, स्टॉल, बेल्ट्स, जॅक्ट्स कॅरी केल्याने याची शोभा वाढेल.