बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

Baranded Hand Bags महागड्या हँड बॅग्स खरेदी करताना घ्या ही खबरदारी

hand bags
आजकाल ब्रँडेड कपड्यांच्या जोडीने ब्रँडेड अ‍ॅक्सेसरीजही वापरण्याबाबत महिला जास्त दक्ष होत आहेत. हातातली पर्स किंवा हँड बॅग, शूज पर्यंत सर्व काही एखाद्या प्रसिद्ध ब्रँडचेच वापरण्याकडे आजकाल वाढता कल दिसून येत आहे. महिलांच्या बाबतीत म्हणायचे झाले, तर घराबाहेर पडताना आवर्जून बरोबर घेतली जाणारी वस्तू म्हणजे हँड बॅग, किंवा पर्स. हँड बॅग, हे आत केवळ पैसे किंवा इतर आवश्यक वस्तू ठेवण्याचे साधन राहिले नसून आता ते 'स्टाइल स्टेटमेन्ट' झाले आहे.

म्हणूनच सुप्रसिद्ध देशी विदेशी ब्रँडस्‌च्या हँड बॅग्सना बाजारामधे मोठी मागणी आहे. पण एखादी महागडी हँड बॅग खरेदी करताना आपण 'डुप्लिकेट' बॅग तर खरेदी करत नाही ना, याबद्दल जागरूक असणे गरजेचे आहे. आजकाल बाजारामध्ये अनेक मोठमोठ्या ब्रँडस्‌ची नावे वापरून नकली माल विकला जात आहे. आपली फसवणूक होऊ नये याकरिता आपण खबरदारी घेणे आवश्यक आहे. आपण निवडलेली बॅग  'ओरिजीनल' आहे की 'फेक' आहे हे कळणे काहीसे कठीणच म्हणावे लागेल. पण ज्या व्यक्तीला हँड बॅग्सची चांगली माहिती आहे, त्याला हा फरक कळल्यावाचून राहणार नाही. जगप्रसिद्ध ब्रँडच्या बॅग्स हाताने बनविलेल्या (हँड मेड) असतात. त्यामुळे त्यांच्यावरील शिलाई पाहून त्या लगेच ओळखता येऊ शकतात. जर बॅगवरील शिवण मशीनची असली, तर ती बॅग ओरिजीनल नाही हे समजायला हरकत नाही.