गेट रेडी फॉर पार्टी
ऑफिसनंतर एखाद्या डिनर पार्टीला जायचं तर घरी जाऊन कपडे बदलायचा खूप कंटाळा येतो. अशावेळी मग जाऊ दे ती पार्टी असं म्हणून आपण पार्टीला जाणंच टाळतो. पण मित्रमंडळींना वेळ देणंही गरजेचं आहे. लोकांसोबतमिसळायला हवं. फक्त काम एके काम असं करून चालत नाही. म्हणूनच ऑफिसमध्ये काही ट्रेंडी शर्ट कॅरी करता येतील. हे शर्ट घालून तुम्ही डिनर पार्टीलाही जाऊ शकता.
* फिटिंगवाला ग्रे शर्ट ट्राय करा. योग्य फिटिंगचा फॉर्मल शर्ट कोणत्याही ऑकेजनची शान ठरतो. हा शर्ट तुम्ही मीटिंगलाही घालू शकता आणि ऑफिस सुटल्यावर एखाद्या पार्टीमध्येही नाचू शकता. बत्तमीज दिल... म्हणत नाचणारा रणबीर कपूर तुम्हाला आठवत असेल. त्यानेही असाच फॉर्मल शर्ट कॅरी केला होता.
* हाफ स्लीव्ह फॉर्मल शर्ट हा फॉर्मल शर्टपेक्षाही अधिक आरामदायी पेहराव आहे. पार्टीत खाऊन खूप पोट भरलं तर पँटमध्ये खोचलेला शर्ट बाहेरही काढता येईल. मस्त नाचायचं असेल तरी तुम्ही हा लूक कॅरी करू शकता.
*ओव्हरसाईझ्ड शर्ट ऑफिसमध्ये घालून जा. यात तुम्हाला खूप आरामदायी वाटेल. पार्टीसाठी लेअरिंग म्हणून हा शर्ट वापरता येईल.
* आरामदायी पेहरावावर तुमचा भर असेल तर प्रिंटेड शर्ट तुमच्याकडे असायला हवा.
* पोलो शर्टस् कोणत्याही ऑकेजनला चालून जातात. हे शर्ट वैविध्यपूर्ण पद्धतींनी कॅरी करता येतात. ऑफिस डेस्कपासून डिनर टेबलपर्यंत पोलो शर्टस् घालूनतुम्ही कुठेही वावरू शकता.
* प्रिंटेड शर्ट ऑफिसमध्ये कॅरी करता येत नाहीत हा समज काढून टाका. या शर्टमुळे तुम्ही काही मिनिटांमध्ये पार्टीसाठी तयार होऊ शकता. सध्या प्रिंटेड शर्टस्ची चलती आहे. त्यामुळे अगदी बिनधास्त हे शर्ट कॅरी करा.
गेट रेडी फॉर पार्टी
ओंकार काळ